Electricity Cut | खुशखबर ! शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा.. आता शेतातील वीज कापली जाणार नाही !
Electricity Cut | शेतकरी हा अन्नदाता आहे . शेतात अन्नधान्य पिकवला जाते आणि आपण त्यावर जगतो . शेतकऱ्याला त्यासाठी बऱ्याचशा अडचणींना सामोरे जावे लागते कधी निसर्गाचा प्रभाव तर कधी पाण्याची कमतरता. पण प्रश्न हा असा उद्भवतो की जर अन्नधान्य पिकवलं नाही तर काय खाणार ? (Electricity Connection) त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी योग्य पाणी पुरवठा आणि वीज पुरवठा व्हायला हवा. अर्थात तो त्यांचा अधिकारच आहे. राज्यात सातत्याने आस्मानी संकट, ओला आणि कोरडा दुष्काळ यामुळे (Lifestyle) राज्यातील विविध भागातील शेतकऱ्यांची परिस्थिती गेल्या दोन ते तीन वर्षात नाजूक झालीय.
या दरम्यान वीजबिलाच्या मुद्द्यावरुन शेतकऱ्यांच्या शेतातील (Lifestyle) वीज महावितरणाकडून कापली जात होती. वीजपंपाची वीज कापली गेल्यामुळे शेतकरी अक्षरश: हवालदिल झाले होते. शेतकऱ्यांच्या या समस्येवर राज्य अन्न आयोगाने मोठा निकाल जाहीर केला आहे. या निकालातून अन्न आयोगाने महावितरणाला (Insurance) शेतकऱ्याच्या शेतातली वीज न कापण्याची सूचना वजा आदेशच दिला आहे. त्यामुळे महावितरणाला आता शेतकऱ्यांच्या शेतातील वीज कापता येणार नाही.
वाचा: Compensation | ब्रेकिंग न्यूज: लाखो शेतकऱ्यांना दिलासा! 50 हजाराच्या प्रोत्साहन अनुदानाच्या ‘या’ जाचक अटी रद्द..
शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा –
हा निर्णय शेतकऱ्यांना दिलासादायक आहे .यापुढे वीज कंपन्यांनी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापू नये, असा आदेश आयोगाने महावितरण विभागास दिला आहे. अन्न कायद्यानुसार दाखल याचिकेत आयोगाने निकाल जाहीर करत संबंधित आदेश दिलाय. लोक संघर्ष मोर्चाच्या वतीने सचिन धांडे यांनी शेतकऱ्यांच्या वीज पुरवठा (Insurance) खंडित करण्या विरोधात अन्न आयोगात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर निकाल देत अन्न आयोगाने शेतकऱ्यांच्या शेतात पिके उभी असताना कुठल्याही शेतकऱ्यांचे वीज (Lifestyle) कनेक्शन कापू नये असा आदेशच दिलाय.
अन्नाचा नाश होऊ नये म्हणून हा मोठा निर्णय –
शेतकऱ्याच्या शेतीचं वीज कनेक्शन कापलं गेलं तर शेतातील उभं पीक नष्ट होतं. त्यानंतर शेतातून कुठलंही उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे अन्न नष्ट होतं. ती राष्ट्रीय संपत्ती आहे, ती संपत्ती नष्ट होते. त्यामुळे पीक निघेपर्यंत तरी वीज कनेक्शन कट करु नये, राज्य अन्न आयोगाने अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत निकाल दिला आहे की, शेतामध्ये पीक उभं (Insurance) असेपर्यंत कोणत्याही शेतीचं वीज कनेक्शन काढू नये. या निकालाचं (Lifestyle) आम्ही स्वागत करतो. लोकप्रतिनिधींना या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी विनंती कतो”, अशी प्रतिक्रिया सचिन धांडे यांनी दिली.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा: