ताज्या बातम्या

Electric Scooter | सर्व इलेक्ट्रिक स्कूटरची बोलती बंद! आली 201 किमीची रेंजसह 70च्या टॉप स्पीडची ‘ही’ नवी स्कूटर; जाणून घ्या फीचर्स

Web Title: All electric scooters are closed! A new scooter with a range of 201 km and a top speed of 70 km has arrived; Know the features

Electric Scooter | इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक Pure EV ने ePluto 7G Max इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1,15,000 रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. स्कूटर लॉन्च होताच बुकिंगही सुरू झाले आहे. आगामी सणासुदीच्या काळात नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्सची डिलिव्हरी सुरू करण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

ePluto 7G Max इलेक्ट्रिक स्कूटर
ही रेट्रो डिझाइन केलेली इलेक्ट्रिक स्कूटर चार वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये मॅट ब्लॅक, रेड, ग्रे आणि व्हाईट रंगांचा समावेश आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरला 3.5 kWh लिथियम आयन बॅटरी पॅकमधून पॉवर मिळते. स्कूटरची इलेक्ट्रिक मोटर 3.21 bhp चा पीक पॉवर आउटपुट देते.

वाचा : या 3 इलेक्ट्रिक टू-व्हीलर भारतात लॉन्च; अगदी कमी किमतीत खरेदी करू शकता, काय आहेत किमती? पहाच..

ePluto 7G Max इलेक्ट्रिक स्कूटर फिचर्स
यात AIS-156 प्रमाणित बॅटरी पॅक बसवण्यात आला आहे जो AI पॉवर्ड स्मार्ट बॅटरी मॅनेजमेंट सिस्टमसह येतो. स्कूटरमध्ये तीन वेगवेगळे राइडिंग मोड देखील दिले गेले आहेत. स्कूटरची बॅटरी 60,000 किलोमीटरच्या मानक वॉरंटीसह येते. याशिवाय 70,000 किलोमीटरची विस्तारित वॉरंटीही दिली जात आहे.

ePluto 7G Max स्कूटर रेट्रो डिझाइनमध्ये सादर करण्यात आली आहे. यात सुमारे एलईडी हेडलाइट, संपूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि राउंड रियर व्ह्यू मिरर आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही स्कूटर स्मार्ट रिजनरेटिव्ह तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. रायडरची सोय वाढवण्यासाठी यामध्ये रिव्हर्स मोड आणि पार्क असिस्टंट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

टॉप स्पीड
या इलेक्ट्रिक स्कूटरला ऑटो पुश फंक्शन देण्यात आले आहे. ज्यामुळे स्कूटर ताशी 5 किलोमीटर वेगाने आपोआप पुढे सरकते. त्याचा टॉप स्पीड 70 किलोमीटर प्रति तास आहे. कंपनीने ही स्कूटर अशा लोकांसाठी लॉन्च केली आहे जे दररोज सुमारे 100 किलोमीटर प्रवास करतात.

हेही वाचा :

Web Title: All electric scooters are closed! A new scooter with a range of 201 km and a top speed of 70 km has arrived; Know the features

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button