ताज्या बातम्या

Eknath Shinde | मोठी बातमी! आचारसंहितेपूर्वी सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जापासून ते सिंचानापर्यंत केल्या मोठ्या घोषणा

Eknath Shinde | Big news! Before the code of conduct, the government made big announcements for farmers, from loans to irrigation

Eknath Shinde | महायुती सरकारने एक लाख 60 हजार रुपयांपर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बीड येथे किसान क्रेडीट कार्डच्या डिजीटल प्रकल्प – जनसमर्थचा शुभारंभ करताना ही घोषणा केली.

  • शेतकऱ्यांसाठी घोषणा
  • एक लाख 60 हजार रुपयांपर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ.
  • किसान क्रेडीट कार्ड डिजीटल झाले, शेतकऱ्यांना घरबसल्या कर्जासाठी अर्ज करता येईल.
  • गेल्या दीड वर्षात शेतकऱ्यांना 45 हजार कोटींची मदत.
  • 120 नवीन सिंचन प्रकल्प, 15 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार.
  • एक रुपयात पीक विमा योजना आणि जलयुक्त शिवार योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल.
  • काय म्हणाले मुख्यमंत्री?
  • “हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे आहे. डिजीटल क्रांतीचा वापर शेतकऱ्यांसाठी करण्याचा हा प्रकल्प त्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणेल.”
  • “आमचे सरकार सर्वसामान्यांचे आणि शेतकऱ्यांचे आहे. गेल्या दीड वर्षात शेतकऱ्यांना 45 हजार कोटींची मदत केली आहे.”
  • “राज्य सरकार राबवत असलेल्या एक रुपयात पीक विमा, जलयुक्त शिवार अशा योजनांचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल.”

वाचा | Crop Insurance | शेतकऱ्यांना मिळाले फक्त 25 टक्के पैसे! उर्वरित रक्कम अडकली बँकेत; वाचा महत्वाची माहिती

  • कृषी मंत्री धनंजय मुंडे काय म्हणाले?
  • “किसान क्रेडीट कार्डच्या डिजिटायझेशनसाठी देशातील दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली. त्यामध्ये बीड जिल्ह्याचा समावेश आहे.”
  • “गेल्या काही दिवसांत 4 लाख 75 हजार शेतकऱ्यांची नोंदणी करून त्यांचे फार्मर्स आयडी तयार केले आहेत.”
  • या योजनेचे फायदे:
  • शेतकऱ्यांना कागदपत्रे नसताना घरबसल्या कर्जासाठी अर्ज करता येईल.
  • शासनाच्या इतर योजनांसाठीही अर्ज करणे आणि लाभ घेणे सोपे होईल.

Wenb Title | Eknath Shinde | Big news! Before the code of conduct, the government made big announcements for farmers, from loans to irrigation

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button