ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
योजना

मुद्रा योजनेअंतर्गत 1 लाखाची गुंतवणूक करून महिना 40 हजार कमवा; हा व्यवसाय ठरतोय फायदेमंद..

कोरोना परिस्थितीमध्ये (corona situation) लोकांचा जास्त कल व्यवसायाकडे (Business) वळला आहे. यामध्ये कमी खर्चात अधिक नफा देणारे व्यवसायाच्या (Business) शोधात असलेले लोक पहायला मिळतात. तर अशा व्यवसाय उभा करू इच्छिणाऱ्या लोकांना कमी खर्चिक व्यवसायाबद्दल माहीत असणे गरजेचे आहे. अधिक उत्पन्न देणारा कमी खर्चातील व्यवसाय (Business) तो म्हणजे बिस्किटांचा व्यवसाय. हा व्यवसाय (Business) उभा करण्यासाठी खर्च तसेच मिळणारा नफा याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया…

वाचा –

बेकरी इंडस्ट्रीसाठी मोदी सरकार मदत करते –

बिस्किटांची मागणी (Demand for biscuits) आपल्याला माहीत आहे. प्रत्येकघरी रोज गरज पडत असलेल्या बिस्किटांचा व्यवसाय उभा करून अधिक चांगल्या प्रमाणे उत्पन्न काढू शकतो. तसेच बेकरी इंडस्ट्रीसाठी (Bakery Industry) मोदी सरकार मदत करते. लॉकडाऊन मध्ये बरेच व्यवसाय स्थगित झाल्याचे आपण पाहिले. पण याच लॉकडाऊन (Lockdown) मध्ये एक व्यवसाय चांगला चालला तो म्हणजे बिस्किटांचा. पारले जी बिस्किटांची मोठी विक्री झाली आपण पाहिले तर मागील 82 वर्षातील रेकॉड ब्रेड झाला असल्याचे नमूद झाले आहे. बेकरी प्रोडक्ट (Biscuit Making Plant) व्यवसाय सुरू करू शकता.

वाचा –

मुद्रा योजनेअंतर्गत 1 लाखांची गुंतवणूक करावी लागेल-

या योजनेअंतर्गत तुम्हाला एक लाखांची गुंतवणूक करावी लागेल. व्यावसायिकाला खर्चाच्या 80 टक्के रक्कम देण्यासाठी सरकारने एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला आहे.
सरकारच्या गिणतीनुसार या व्यासायमधून 40 हजार महिना नफा होणार असल्याचे सांगितले आहे.

किती खर्च येईल ?

सर्वात महत्वाचं म्हणजे प्रोजेक्टसाठी 500 स्क्वेअर फूट स्वत:ची जागा असायला हवी. किंवा भाडेतत्त्वावर (rent basis) असेल तर तसे पेपर दाखवावे लागतील. तसेच एकूण 5.36 लाख रुपये प्रोजेक्टसाठी (For the project) असणार आहेत यापैकी तुम्हाला फक्त एक लाखांची गुंतवणूक करावी लागेल. मुद्रा योजनेअंतर्गत (Mudra Yojana) तुमची निवड झाल्यास तुम्हाला बँकेतून टर्म लोन 2.87 लाख रुपये आणि वर्किंग कॅपिटल लोन 1.49 लाख रुपये मिळणार.

वाचा –

सर्व बँकेत ही योजना उपलब्ध –

या पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत (Under the Prime Minister’s Currency Scheme) कोणत्याही बँकेत अर्ज (Bank application) करण्याची सोय उपलब्ध केलेली आहे. यासाठी एक फॉर्म भरावा लागेल. त्यात नाव, पत्ता, व्यवसायाचा पत्ता, शिक्षण, सध्याचं चालू इन्कम, किती कर्ज हवं अशी माहिती भरावी लागेल. लोन अकाउंट 5 वर्षात परत करावे लागणार आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button