ताज्या बातम्या

E-Peak Inspection | शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! आता दुष्काळी सवलतींसाठी ई-पीक पाहणी बंधनकारक, जाणून घ्या

E-Peak Inspection | Important news for farmers! E-Peak inspection now mandatory for drought concessions, Know

E-Peak Inspection | खरीप हंगामातील नुकसानीनंतर शेतकऱ्यांना दुष्काळी सवलती मिळण्यासाठी ई-पीक पाहणी (E-Peak Inspection) नोंदणी बंधनकारक बनवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. दुष्काळी तालुक्यांमधील १८ हजार हेक्टर क्षेत्रावरील पीकपाणी शेतकरी गट आणि सर्व्हे नंबरच्या याद्या तयार करण्याचे आदेश महसूल आणि कृषी विभागाला देण्यात आले आहेत. या याद्या तयार करण्यासाठी तलाठी आणि कृषी (Department of Agriculture) सहायक यांच्यावर मोठा ताण आला आहे.

शासनाच्या निकषानुसार दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ८५०० रुपये मदत मिळणार आहे. तालुक्यातील १८ हजार हेक्टर क्षेत्राला किमान १५ ते १६ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

शासन निविष्ठा स्वरूपात मदत देण्याचा निर्णय घेतल्यास शेतकऱ्यांना खते, बियाणे, औषधे इत्यादी मदत थेट मिळणार आहे. तालुक्यातील १०० टक्के जिरायत खरीप क्षेत्राच्या सरसकट शेतकऱ्यांच्या गट आणि सर्वे नंबरनुसार याद्या तयार करण्याच्या सूचना कृषी सहायकांना देण्यात आल्या आहेत.

वाचा | Tractor Subsidy Scheme | गुडन्यूज! केंद्र सरकार शेतकऱ्यांना निम्म्या किमतीत देतंय ट्रॅक्टर; जाणून लगेच करा खरेदी

  • शेतकऱ्यांनी या गोष्टी लक्षात घ्याव्यात
  • ई-पीक पाहणी मध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच दुष्काळी सवलती मिळतील.
  • शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधून आपली नोंदणी असल्याची खात्री करून घ्यावी.
  • ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली नाही त्यांनी तात्काळ नोंदणी करावी.
  • या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी वेळीच नोंदणी करून आवश्यक कागदपत्रे जमा करावीत.

Web Title | E-Peak Inspection | Important news for farmers! E-Peak inspection now mandatory for drought concessions, Know

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button