“इ-फेरफार” मध्ये पोपर्टी कार्डचाही समावेश; ऑनलाइन प्रक्रियेसाठी एक दिवसांचा दिला जाणार कालावधी..
आता नागरिकांचा कार्यालयात जाण्याचा त्रास कमी होणार आहे. “भूमी अभलेख”कार्यालयाने योजना आणलेली आहे. या योजनेत “इ-फेरफार” (E-modification) मध्ये पोपर्टी कार्डचाही समावेश करण्यात आला आहे. मिळकतींची खरेदी, हक्कसोडपत्र किंवा बक्षीसपत्र केले असेल तर प्रॉपर्टी कार्डवर (On the property card) नोंद घेण्यासाठी सिटी सर्व्हेच्या कार्यालयात हेलपाटे मारायची गरज पडणार नाही. दस्त नोंदणी झाल्यानंतर ऑनलाइनच्या माध्यमातून संबंधित जमिनीच्या सातबारा आणि फेरफार उताऱ्यामध्ये नोंद घेणाऱ्या “ई-फेरफार” (E-modification) या योजनेत आता प्रॉपर्टी कार्डचाही समावेश केला आहे. याविषयी आपण सविस्तर माहिती पाहुया..
वाचा –
भूमी अभिलेख कार्यालयाची योजना –
राज्यात सहा जिल्ह्यांत (In six districts in the state) ही योजना (Scheme) भूमी अभिलेख कार्यालयाकडून सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांचा देखील समावेश आहे. त्यामुळे एखाद्या मिळकतीचा व्यवहार झाल्यानंतर केवळ 21 दिवसांत त्या मिळकतीच्या प्रॉपर्टी कार्डवर (property card) ऑनलाइनच्या माध्यमातून फेरफारची नोंद घेतली जाणार असल्याचे सांगितले आहे.
भूमी अभिलेख विभागाच्या विविध सेवा –
सध्या पारंपरिक पद्धतीने (traditional way) हीच नोंद घेण्यासाठी एक ते दीड महिन्यांचा कालावधी लागतो. भूमि अभिलेख विभागाने विविध प्रकारच्या सेवा ऑनलाइन देण्यावर भर दिला आहे. यापूर्वी ग्रामीण भागातील जमिनी खरेदी-विक्रीचा (Buying and selling) व्यवहार झाल्यावर खरेदीदाराची सातबारा उताऱ्यावर नोंद होण्यासाठी ई-फेरफार (E-modification) योजना सुरू करण्यात आली.
वाचा –
एनआयसी संगणकीय मार्फत तयार केली –
वेळ आणि पैसा दोन्ही वाचवला आहे. नागरिकांना कार्यालयात माराव्या लागणाऱ्या चक्रा कमी झाल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर “भूमि अभिलेख” विभागाने प्रॉपर्टी कार्डच्या मिळकतींच्या खरेदी विक्रीसाठी ऑनलाइन ई-फेरफार करण्यासाठी ‘एनआयसी’ (NIC) मार्फत संगणकीय प्रणाली तयार केली आहे. सर्व प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. एकाच दिवसात होणार आहे. यातील पुढील टप्पा म्हणजे नोटीसवर हरकत देण्यासाठी 15 दिवसांचा अवधी देण्यात येणार आहे. हरकत दाखल न झाल्यास प्रॉपटी कार्डवरील ई-फेरफार (E-modification) ऑनलाइन तयार होणार आहे, अशी माहिती भूमि अभिलेख विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा