योजना

E-Labor Scheme | ई-श्रम योजना काय आहे? लाभासाठी कसा करावा अर्ज? आवश्यक कागपत्रांसह जाणून घ्या सविस्तर

What is e-Labour Scheme? How to apply for benefits? Know in detail with required documents

E-Labor Scheme | भारतात असंघटित क्षेत्रातील कामगारांची संख्या मोठी आहे. या कामगारांना कोणत्याही प्रकारचे सामाजिक सुरक्षा लाभ मिळत नाहीत. या कामगारांच्या हितासाठी केंद्र सरकारने ई-श्रम योजना सुरू केली आहे. ही योजना 2022 मध्ये सुरू करण्यात आली.

ई-श्रम योजना काय आहे? What is e-Labour Scheme?
ई-श्रम योजना
ही असंघटित क्षेत्रातील कामगार आणि मजुरांना एकत्रित आणण्यासाठी काम करते. या योजनेअंतर्गत फेरीवाले, भाजी विक्रेते, घरगुती कामगार, लहान नोकरी करणारे तरुण यांना लाभ घेता येणार आहे. या योजनेअंतर्गत कामगारांना दोन लाख रुपयांचा अपघात विमा दिला जातो. तसेच, सरकारने जर कोणती योजना सुरू केली तर या कार्डच्या आधारे त्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल.

वाचा : मोठी बातमी, “या” कामगारांसाठी “इ-श्रम” कार्ड योजना उपलब्ध; काय आहे ही योजना? जाणून घ्या सविस्तर..

ई-श्रम कार्डचे फायदे Benefits of e-Shram Card
दोन लाख रुपयांचा अपघात विमा
सरकारच्या योजनांचा लाभ
कामाच्या संधीमध्ये वाढ
सामाजिक सुरक्षा

ई-श्रम कार्ड कसे मिळवायचे? How to get e-Labour Card?
ई-श्रम कार्ड मिळवण्यासाठी, तुम्हाला eshram.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. वेबसाइटवर जाऊन, “Register” या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर, आधार कार्डशी लिंक केलेला फोन नंबर टाका आणि ओटीपी भरा. फॉर्ममध्ये दिलेली माहिती भरा आणि सबमिट करा. तुमचे ई-श्रम कार्ड तयार होईल.

ई-श्रम कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे Required Documents for E-Labour Card
आधार कार्ड
पासपोर्ट साइज फोटो
उत्पन्नाचा दाखला
बँक पासबुक
ई-श्रम योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी वरदान आहे. या योजनेमुळे त्यांना सामाजिक सुरक्षा लाभ मिळतील आणि त्यांना कामाच्या संधीमध्ये वाढ होईल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: What is e-Labour Scheme? How to apply for benefits? Know in detail with required documents

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button