E-HIGHWAY | हवेत उडणाऱ्या बसच्या संकल्पनेनंतर; नितीन गडकरी करणार ई- हायवे; पेट्रोल डिझेलला करणार हद्दपार.. - मी E-शेतकरी
ताज्या बातम्या
ट्रेंडिंग

E-HIGHWAY | हवेत उडणाऱ्या बसच्या संकल्पनेनंतर; नितीन गडकरी करणार ई- हायवे; पेट्रोल डिझेलला करणार हद्दपार..

E-HIGHWAY | काही दिवसांपूर्वी पुण्यात ट्रॅफिक पाहून केंद्रीय वाहतूक आणि अवजड विकास मंत्री नितीन गडकरींनी हवेत उडणाऱ्या बसची संकल्पना मांडली होती. आता त्यानंतर ई- हायवे (e – highway) तयार करण्याची संकल्पना त्यांनी आयआयटीमध्ये संवाद साधताना त्यांनी सांगितले. देशात ई-हायवे तयार करणार असल्याने यासाठी कुणी तरी चांगलं संशोड करावं असे ते म्हणाले आम्ही त्याच्या मागे उभे राहू.

पेट्रोल आणि डिझेल थांबवण्याची गडकरींची इच्छा:

नितीन गडकरींनी सार्वजनिक वाहतूक व्हावी यासाठी ई- हायवेची (e – highway) संकल्पना त्यांनी मांडली. पेट्रोल आणि डिझेल हे बंद व्हावं अशी नितीन गडकरींची इच्छा आहे अस त्यांनी मुंबई आयआयटीमध्ये आयोजित कार्यक्रमात सांगितले. आयआयटीत आणि इतर विद्यार्थी यांच्यात खूप फरक आहे. इकडच्या विद्यार्थी चांगल संशोधन करू शकता,असे ते म्हणाले.

वाचा: Rare News | खरचं की काय? महाराष्ट्रातील ‘या’ गावात 32 एकर जमिनीचे मालक आहेत माकडं; कसं ते जाणून घ्या सविस्तर

मलेशियात 102 तर मुंबईत मेट्रो पुलाच्या ब्रिजचे 30 मीटर अंतर:

ते आयआयटीमध्ये बोलले की; आयआयटीपुढेच मेट्रो रेल्वेच स्टेशन आहे. तसेच मलेशियात मेट्रो पुलाच्या ब्रिजचे अंतर 102 मीटर आहे. तसेच मुंबईत याचेच अंतर 30 मीटर एवढं आहे. त्या ठिकाणी फायबर स्टीलचा वापर केला जातो. अस काही तरी आपण भारतात करावं अस ते म्हणाले.

दिल्लीत खूप हुशारीने काम करावं लागतं:

याचवेळी दिल्लीत सुरुवातीला नितीन गडकरी गेले होते. त्यावेळी त्यांना ते सर्व नवख वाटत होत. दिल्लीच्या पाण्यापेक्षा महाराष्ट्राचं पाणी चांगलं असल्याचं ते म्हणाले. पुढे ते म्हणाले; मी ज्यांना मोठ समजायचो पण ते मोठे नव्हते आणि ज्यांना मी छोट समजायचो ते देखील छोटे नव्हते.

आपण आयात काय करतो ते बघा. त्याला पर्याय शोधा, त्यावर रिसर्च करा त्याचा खूप फायदा होईल असेही गडकरी म्हणाले. मला पेट्रोल डिझेलला हद्दपार करायचं आहे, हा एक अवघड संकल्प असल्याचेही गडकरी म्हणाले.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button