कृषी बातम्या

Crop Insurance | अतिवृष्टीग्रस्तांसाठी महत्वाची बातमी! ‘ही’ प्रक्रिया केली तरचं मिळणार नुकसान भरपाई

Crop Insurance | यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच शेती (Agriculture) पिकांच्या नुकसानीसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक (Financial) मदतीसाठी तब्बल 3 लाख 501 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात मंजुरी देण्यात आली होती. या पीक विम्याची (Crop Insurance) मदतीसाठी शेतकऱ्यांना पात्र करण्यात आले आहे. तसेच शेती (Agricultural Information) पिकांचे झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करण्यात आले आहेत. परंतु आणखी एक प्रक्रिया केली तरच शेतकऱ्यांना या नुकसान भरपाईसाठी मिळणाऱ्या मदतीचा लाभ होणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात.

वाचा: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीक नुकसानीचे 1 हजार 106 कोटी आले, ‘या’ तारखेपासून होणार खात्यात जमा

पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कशी मिळणार मदत
शेतकऱ्यांना पीक विमा (Crop Insurance) योजनेच्या अटी निकषानुसार 33 टक्के नुकसान झाल्यास मदत देण्यात येणार आहे. राज्यशासनाच्या माध्यमातून जिरायत क्षेत्रासाठी हेक्टरी 13 हजार 600 रुपये तर बागायत क्षेत्रासाठी हेक्टरी 27 हजार रुपये आणि फळबागांसाठी 36 हजार रुपये अशी मदत जाहीर करण्यात आली आहे.

वाचा: आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर वाढले; भारतीय बाजारातही सोयाबीनचे दर सुधारणार

‘ही’ प्रक्रिया केली तरच मिळणारं लाभ
शेतकऱ्यांना 33 टक्के नुकसान झाले असल्यास पात्र करण्यात येते. अशी पीक विमा योजनेचे निक्ष आहेत. मात्र अनेकदा यामध्ये गावांतील जिल्ह्यातील काही मंडळे पात्र करण्यात येतात. परंतु मंडळात पात्र झालेल्या सर्व शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीची पाहणी करणे शक्य नसते. म्हणूनच सरकारच्या माध्यमातून ई- पीक पाहणी ही डिजिटल प्रक्रिया शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आणली.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीचा साडेतीन कोटींचा निधी वाटप

या प्रक्रियेसाठी सरकारने ई- पीक पाहणी ऍप लॉन्च केले. मात्र पहिल्या वर्जनमध्ये शेतकऱ्यांना काही अडचणी निर्माण होत होत्या त्यासाठीच सरकारने या ऍपच्या वर्जन टू ची निर्मिती केली. ज्या शेतकऱ्यांनी आपल्या नुकसान झालेल्या पिकाचा क्लेम करून ई -पीक पाहणी केली असेल त्याचं शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत भरपाईची मदत मिळणार आहे. अन्यथा या योजनेअंतर्गत मदत मिळण्यास तफावत निर्माण होऊ शकते.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Important news for heavy rain victims! Damage compensation if ‘this’ process is done

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button