योजना
Dull animals| दुधाळ जनावरांचा गट पुरवठा योजना: आर्थिक उन्नतीचा मार्ग|
Dull animals| पुणे, १७ जुलै २०२४:
समाजातील मागासलेल्या घटकांना आर्थिकदृष्ट्या (Financially) सक्षम बनवण्यासाठी शासन अनेक योजना राबवते. याच योजनेचा एक भाग म्हणून, अनुसूचित जाती, नवबौद्ध आणि जमाती प्रवर्गातील नागरिकांसाठी दधाळ जनावरांचा गट पुरवठा योजना राबवण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेऊन अनेक कुटुंबांनी स्वयंरोजगार मिळवून आर्थिक उन्नती केली आहे.
योजनेचे उद्दिष्ट:
- ग्रामीण भागात राहणाऱ्या गरीब आणि मागासवर्गीय (Backward class) कुटुंबांना दुधाळ जनावरांचा पुरवठा करून त्यांना स्वयंरोजगार मिळवून देणे.
- पशुपालन क्षेत्राचा विकास करून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना दणे.
योजनेअंतर्गत मिळणारे लाभ:
- दोन दुधाळ गाई किंवा म्हशींचा पुरवठा (संकरित गाय – एच.एफ. किंवा जर्सी, म्हैस – मुऱ्हा किंवा जाफराबादी, देशी गाय – गीर, साहिवाल, लाल सिंधी, राठी, थारपारकर (Tharparkar), देवनी, लाल कंधारी, गवळाऊ आणि डांगी)
- 75% अनुदान (योजनेसाठी लाभार्थ्यांनी 25% रक्कम स्वतःची जमा करणे आवश्यक आहे.)
- प्रशिक्षण आणि मार्गदर्शन
वाचा: Recruiting| भारतीय टपाल विभागात मोठ्या प्रमाणात भरती! ४४,२२८ ग्रामीण डाक सेवक पदांसाठी अर्ज आमंत्रित|
योजनेसाठी पात्रता:
- लाभार्थी अनुसूचित जाती, नवबौद्ध किंवा जमाती प्रवर्गातील (category) असणे आवश्यक आहे.
- लाभार्थीचे वय किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील असणे आवश्यक आहे.
- लाभार्थ्याकडे 1 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र असणे आवश्यक आहे.
लाभार्थ्यांची निवड:
- लाभार्थ्यांची निवड जिल्हा पशुसंवर्न उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समिती करते.
- निवड करताना महिला आणि दिव्यांगांना प्राधान्य दिले जाते.
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड (Aadhar Card)
- मोबाईल क्रमांक
- 7/12 आणि 8-अ उतारे
- शिधापत्रिका (रेशनकार्ड)
- राष्ट्रीयकृत बँक खाते पासबक
- अर्जदाराचे छायाचित्र
- अनुसूचित जाती/जमाती प्रमाणपत्र
- दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)
- दिव्यांग प्रमाणपत्र (जर लागू असेल तर)
अधिक माहितीसाठी:
- पशुधन विकास अधिकारी
- जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी