Crop Insurance | यावर्षी पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या तुलनेत विमा कंपनीने भरपाईची रक्कम दिली नाही. तसेच भरपाई देताना दुजा भाव करत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना (Agriculture) अद्यापही विमा कंपनीने अजूनही भरपाईची रक्कम न दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वाखाली आज 8 डिसेंबर रोजी संतापलेल्या शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयावर आज धडक देत कृषी अधिकारी यांचे दालनात ४ तास ठिय्या देत आंदोलन केले.
वाचा:अर्रर्र..! पुढचे चार दिवस राज्यात पावसाचं वातावरण; त्वरित जाणून घ्या हवामान आधारित कृषी सल्ला
शेतकऱ्यांना 100% पीक विमा द्या
सर्व शेतकऱ्यांना 100% पिक विमा भरपाई द्या, शेतकऱ्यांच्या बँक (Bank Loan) खात्यावर कमी जास्त रक्कम टाकून शेतकऱ्यांची चेष्टा करणाऱ्या विमा कंपनीवर कार्यवाही केल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा स्वाभिमानचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी यावेळी बोलताना दिला. यावर्षी सततच्या मुसळधार पावसामुळे झालेले नुकसान पाहून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे पीक विम्याची (Crop Insurance) रक्कम भरली असतांना भरपाई देतांना विमा कंपनीने तुटपुंजी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दिली.
बिग ब्रेकिंग! शेतकऱ्यांना तब्बल 50 लाख रुपये देण्याचा राज्य सरकारचा निर्णय; जाणून घ्या सविस्तर
ठिय्या आंदोलन
नुकसानीच्या तुलनेत भरपाई देणे कायद्यानुसार बंधनकारक असतांना विमा कंपनीने तशी भरपाई दिली नाही. तसेच जिल्ह्यातील 46 हजार शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत एक छदामही विमा कंपनीने दिला नाही. भरपाई न मिळालेले शेतकरी सरकारी कार्यालयात चकरा मारत असतांना त्यांची हाक पुकार घ्यायला कोणीच नाही. अशी एकूणच परिस्थिती निर्माण झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज नियोजित कार्यक्रमानुसार कृषी कार्यालवर धडक देत ठिय्या आंदोलन केले.
कंपनीवर कारवाई करा
प्रशांत डिक्कर यांनी जिल्हा कृषी अधीक्षक यांचेशी भ्रमणध्वनीवरून बोलत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारी निकाली काढा व शेतकऱ्यांना तत्काळ 100% विमा रक्कम खात्यावर वितरीत करा आणि शेतकऱ्यांच्या विमा रकमेवर दरोडा टाकणाऱ्या कंपनीवर कारवाई करा. अन्यथा संघर्ष अटळ आहे असा इशारा यावेळी प्रशांत डिक्कर यांनी बोलतांना दिला.
वाचा: आनंदाची बातमी! पुढील महिन्यात कापसाचे दर वाढणार; जाणून घ्या चालू महिन्यात कसा राहील बाजारभाव?
कोणी दर्शवली उपस्थिती?
तालुका उपाध्यक्ष,विलास इंगळे, अकीत दाभाडे, अकरम दौला, धनंजय कोरडे, सुनील जाधव, समाधान धुर्डे, विजय मानकर, विष्णू कूकडे, दिनकर कपले, गणेश गटमने, सुरेश थोटे, श्याम वाघ, अंकुश सुलताने, श्रीकृष्ण बोरोकार, विशाल चोपडे, प्रमोद वाघ, अनंता पान्हेरकर, सय्यद अदनान यांच्या सह बहुसंख्य कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
संतोष देठे पाटील बुलढाणा
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- खर्च आणि फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय! आता शेतकऱ्यांना मिळणार घरबसल्या कीटकनाशक
- ब्रेकिंग न्यूज! ऊस उत्पादकांसाठी आनंदाची बातमी; एकरकमी एफआरपी देण्यासंदर्भात सरकारचा मोठा निर्णय
Web Title: Self-respect in the agriculture office protest! Struggle is inevitable if farmers are not given justice; Prashant Dikkar