Drought Situation Review | दुष्काळावर लक्ष! केंद्रीय पथकाचा आज पासून महाराष्ट्र दौरा सुरू; तुमच्या गावात येणार का?
Drought Situation Review | Focus on drought! Central team tour of Maharashtra starts from today; Will it come to your village?
Drought Situation Review | राज्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयाचे 12 सदस्यांचे पथक महाराष्ट्रात दाखल झाले आहे. हे (Drought Situation Review) पथक मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांचा आजपासून दोन दिवसीय दौरा करणार आहे.
मराठवाड्यात, हे पथक छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव जिल्ह्यांचा दौरा करेल. या जिल्ह्यांतील काही तालुके व गावांमध्ये जाऊन हे पथक पाहणी करणार आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सावंगी, तुळजापूर, चौका, मोरहिरा, खामखेडा, डोणवाडी, तर सोयगाव तालुक्यातील जंगल तांडा, फर्दापूर, धनवट या 11 गावांचा यात समावेश आहे.
धाराशिव जिल्ह्यात, हे पथक धाराशिव, वाशी आणि लोहारा तालुक्यांची पाहणी करेल. या तालुक्यातील शेती, पाणीपुरवठा, जनावरांची स्थिती यासह विविध घटकांचा आढावा घेण्यात येईल.
उत्तर महाराष्ट्रात, हे पथक पुणे, सोलापूर, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांचा दौरा करेल. या जिल्ह्यांतील काही तालुके व गावांमध्ये जाऊन हे पथक पाहणी करणार आहे.
वाचा : One Rupee Insurance | एक रुपया विमा योजना; जनतेचा पैसा सरकरच्या मित्र कंपन्यांना मिळाला का?
दोन्ही दौरे पूर्ण झाल्यानंतर, पुण्यात एक बैठक घेऊन पथकाचे अहवाल तयार केले जातील. हा अहवाल केंद्र सरकारला सादर केला जाईल.
केंद्रीय पथकाच्या आगमनाने राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर केंद्र सरकारकडून मदत मिळण्याची शक्यता आहे.
Web Title : Drought Situation Review | Focus on drought! Central team tour of Maharashtra starts from today; Will it come to your village?
हेही वाचा