ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

राज्यातील ‘या’ सहा जिल्ह्यांवर दुष्काळाचे संकट, यामध्ये तुमचा जिल्हा आहे का?

Drought crisis in 'these' six districts of the state, is your district in it?

राज्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस वेळेत न पडल्यास दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले जाणार आहे. राज्यामध्ये आत्तापर्यंत 27 टक्के पेरणी झाली असून असूनही बाकीचे शेतकरी दमदार पावसाची वाट पाहत आहेत.

राज्यातील 6 जिल्हे दुष्काळाच्या सावटाखाली आहेत. महाराष्ट्रातील औरंगाबाद, बीड,नंदुरबार,नाशिक अकोला धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यावर्षी या जिल्ह्यांमध्ये पंचवीस ते 50% पाऊस झाला आहे, पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांपुढं दुबार पेरणीरचं संकट ओढावण्याची शक्यता आहे. कापूस, मका, तूर आणि सोयाबीनच्या पिकांनी माना टाकल्याचं समोर आलं आहे.

हे ही वाचा : जाणून घ्या ऊस शेतीसाठी वापरण्यात येणारी आधुनिक यंत्रे व त्याचा उपयोग…

हे ही वाचा : आत्ता येणार शेतकरी कायदा! ‘शेतकऱ्याची फसवणूक’ केल्यास होणार दंड व तीन वर्षाचा तुरुंगवास…

राज्यात 8 जुलै नंतर ‘या’ ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता…

भारतीय हवामान विभागानं पुढील पाच दिवसांचा अंदाज जारी केला आहे. या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भात जोरदार पाऊस 7 आणि 8 जुलै रोजी हजेरी लावेल, त्याअंदाजानुसार पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात पाऊस होऊ शकतो. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भ.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

हे ही वाचा :


1. आशियातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ लासलगाव येथे कांद्याची विक्रमी आवक! वाचा सविस्तर बातमी

2. जमिनीची सुपीकता’ (‘Soil Fertility’) वाढवण्यासाठी काय उपाय योजना करावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button