सातत्याने पडणारा पाऊस व ढगाळ हवामानाचा पिकांवर परिणाम होतो बुरशी किडींचे (fungal insects) व रोगांचे मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव (Outbreak) पडल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
मिरची पिकावर पडणारे कीड रोगांचे नियंत्रण:
मिरची पिकावर पिवळसर रंगाची ठिपके पानांवर दिसून येतात तर शेंडेमर रोगाच्या (Schneider’s disease) प्रादुर्भावामुळे मिरचीच्या झाडाचे शेंडे वरून खाली वाळत जातात वेळीच यावर नियंत्रण मिळवले नाही तर पूर्ण झाड वाळून जाण्याची शक्यता राहते.
वाचा : जाणून घ्या, शेवग्याच्या शेतीधून व्यावसायिक कमाईची संधी..
उपाययोजना :
शेंडेमर आणि फळंसड (Fruitful) या रोगांवर नियंत्रण मिळवण्याकरिता कॉपर ऑक्सिक्लोराईड (५०%wp) क २.५ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब (75% wp) 2.5 ग्रॅम प्रोपिनेब (70%wp) 0.5 ग्रॅम वापरल्यास फायदा होऊ शकतो.
‘चिरडामुरडा’ (Chirdamurda) या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने पांढऱ्या माशीद्वारे होत असतो, पांढरी माशी (White fly) पिकांमधील रस शोषून घेत असल्यामुळे मिरचीच्या झाडांना मिरच्या कमी लागतात, मिरच्यांचा आकार वेडावाकडा होतो परिणामी उत्पादनात घट निर्माण होते. चिरडा मुरडारोग अत्यंत घातक स्वरूपात असल्यामुळे त्याचे वेळीच नियंत्रण करायला हवे.
वाचा : भारतातील ‘या’ झाडाची किंमत आहे सोन्यापेक्षाही महाग, वाचा तुम्हाला कशी मिळेल सुवर्णसंधी..
उपाययोजना : (Pest disease control:)
फेनप्रोपाथ्रीन (30%EC) 1मिली, किंवा पायरीप्रॉक्सीफेन (10%EC ) यांची फवारणी केल्यास चिराडामुरडा रोगाचा प्रादुर्भाव टाळला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे हा रोगच आपल्या झाडावर पडू नये यासाठी पिवळे चिकट सापळे 160 प्रतिहेक्टरी पिकांच्या पिकांच्या उंचीच्या समकक्ष लावावेत.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा :