मोबाईलची बॅटरी सारखी डाऊन होते का? मग वापरा या सोपे टिप्स..
Does the mobile battery go down like that? Then easy to use tips ..
आज-काल सर्वांकडे स्मार्टफोन (smart phone ) उपलब्ध आहेत, परंतु कितीही चांगल्या कंपनीचा स्मार्टफोन घेतला तरीही काही दिवसानंतर मात्र त्याची बॅटरी (Battery) सारखी लो (low) होते, इमरजन्सीच्या (Emergency) काळात मोबाईलची बॅटरी वाचवण्यासाठी अशा वेळी काय करावे? जेणेकरून फोनची बॅटरीही वाचेल आणि जास्तवेळ तुम्हाला फोन वापरता येईल. चला तर आपण सोप्या टीप्स पाहूयात…
जेव्हा तुम्हाला स्मार्ट फोनचा ब्राईटनेस (Brightness) आवश्यक आहे तेव्हाच तो वाढवा अन्यथा तो कमी करून ठेवा, ऑटो ब्राइटनेस मोड एंड्रॉयड (Auto Brightness Mode Android) आवश्यक असेल तर वापरा अन्यथा बंद ठेवा. तुमच्या मोबाईल फोनची बॅटरी अनावश्यक वाया जावू नये याची खबरदारी घ्यावी.
वाचा : ‘फेसबुकचे स्मार्टवॉच’ पाहिले आहे का? जाणून घ्या काय आहेत ‘या’ स्मार्टवॉच चे फीचर्स…
अनेक लोकांच्या मोबाईलचा स्क्रीन लॉक (screen lock) करण्याचा वेळ 1 मिनिटं ठेवतात. मात्र असं केल्यानंही बॅटरी उतरते. स्क्रीन लॉकचा टाइम कमी सेकंद ठेवा. तसेच अनावश्यक असलेले एप्लीकेशन डिलीट करा.
फोनमध्ये विनाकारण एप्लिकेशन्स (Applications) ने जागा भरलेली राहाते किंवा फोन मध्ये विनाकारण चा डाटा असतो, अशावेळेस अशा फाइल्स किंवा एप्लीकेशन डिलीट करा याशिवाय तुम्ही बॅटरी सेव्हरचा पर्याय वापरू शकता. नोटिफिकेशन पर्याय किंवा नेट नको असेल तेव्हा बंद करा त्यामुळेही बॅटरी वाचेल.
वाचा : मोबाईल हरवला आहे का? करा ‘हे’ काम अन्यथा होईल मोठे नुकसान..
मोबाईलची बॅटरीचे आयुष्य वाढवण्याकरिता सारखी सारखी बॅटरी चार्ज करू नका, बऱ्याच लोकांना रात्रभर चार्जिंग लावून ठेवण्याची सवय असते त्यामुळे बॅटरी लवकरच निकामी होते. दुसऱ्या मोबाईल कंपनीचे चार्जर वापरू नये, ज्या कंपनीचा मोबाईल आहे त्या कंपनीचा ओरिजनल चार्जर वापरण्याचा प्रयत्न करावा. जास्त होल्टेज असणारा चार्जर वापरू नये, यामुळे बॅटरीचे नुकसान होते.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
हे ही वाचा :
1. भारतीय लोक स्मार्टफोन खरेदी करताना, ‘या’ गोष्टींना सर्वाधिक महत्त्व देतात..
2. टेक्निकल गुरु: बाजारात आला आहे, “होंडाचा पावर टिलर” वाचा; उपयोग आणि वैशिष्ट्य…