खरीप पिक विमा अर्ज भरताय का? मग नक्की वाचा ही माहिती उपयुक्त ठरेल…
Does kharif crop insurance apply? Then definitely read this information will be useful
मागील वर्षी पाहिजे तितका पिक विमा खर्च न मिळाल्याने अनेक शेतकरी नाराज होते, पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांवर अन्याय केला होता, असेल काही शेतकऱ्यांचे म्हणणे होते, यावर पर्याय म्हणून कृषी आयुक्तांनी (By the Commissioner of Agriculture) देखील दखल घेऊन पिक विमा कंपनी यांना योग्य ती नोटीस बजावली होती.
खरीप पिक विमा (Kharif crop insurance) भरण्याची अंतिम मुदत 15 जुलै 2021असून हा पिक विमा भरत असताना अनेक प्रश्न शेतकऱ्यांना नेहमीच पडत असतात, अशा सर्व प्रश्नांची उत्तरे घेण्याचा प्रयत्न आपण या सत्रामध्ये करणार आहोत.
सर्वात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे पीक पेरा या फार्म वर कोणती तारीख टाकावी? खरीप पिक विमा भरत असताना अनेक शेतकऱ्यांना हा प्रश्न पडत असतो, 10 जून नंतर तुम्ही कोणते पीक लावले आहे पीक व त्याची तारीख लिहावी.
खूप सारे शेतकऱ्यांना सातबारा कोणता अपलोड करावा हा प्रश्न पडतो कारण सातबारा तलाठ्याकडे उपलब्ध नसून तो ऑनलाइन पद्धतीने काढावा लागतो आपले पोर्टल अद्यावत करण्यात आलेले असल्याने, मा महाभूमीगट लिंक असल्यामुळे त्यामुळे सातबारा अपलोड करणे ही कंपल्सरी नाही, तरी हस्तलिखित किमान डिजिटल सातबारा असेल तर तो तुम्ही अपलोड करू शकता.
सामायिक क्षेत्र असल्यास पिक विमा कशा प्रकारे भरायचा हादेखील खूप जणांना प्रश्न असतो, ऑनलाइन पद्धतीने हे क्षेत्र व्हेरिफाय होत असल्याकारणाने त्यामुळेच ज्या क्षेत्रधारकाचे मुख्य नाव असती त्याचे नाव घेतले जाते व त्याचे क्षेत्र धारकाचे नावाने पिक विमा भरायचा असतो. यासाठी सामायिक क्षेत्र धारकाचा फॉर्म (Shared field holder form) असून, यामध्ये इतर सहभागी धारक व्यक्तींची नोंद करू शकता.
पिक विमा अर्ज भरत असताना आय एफ एस सी कोड (IFSC) हा व्यवस्थित भरा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात कोणताही त्रास होणार नाही. तसेच आधार कार्ड वरील व सातबारावरील नाव यामध्ये तफावत असल्यास तसेच पासबुक वरील नाव येथे व्हेरिफिकेशन (Verification) करून पाहणे गरजेचे आहे.
याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी, खाली क्लिक करा…
हे ही वाचा :
हवामानाचा अंदाज घेऊन पेरणी करावी – कृषी मंत्री दादाजी भुसे यांचे शेतकऱ्यांना आवाहन!
गणेश चतुर्थी दिवशी येणार, जगातील ‘सर्वात स्वस्त मोबाईल फोन’ वाचा सविस्तर बातमी…