Lifestyle |अंडी खाल्ल्याने होतो हृदयविकाराच्या रुग्णांना त्रास? जाणून घ्या एका दिवसात किती अंडेचे सेवन करावे..
Lifestyle | “सनडे हो या मनडे रोज खा हो अंडे ” अंडी खाणे प्रत्येकाला आवडते.अंडी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. परंतु बरेचदा असे म्हटले जाते की जास्त अंडी खाणे हृदयाच्या रुग्णांसाठी चांगले नाही. आपण दररोज १ ते २ अंडी खाणे आवश्यक आहे. पण दररोज अंडी खाणे हृदयासाठी चांगले आहे का? अंडी खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो का? जर तुम्ही हृदयाचे रुग्ण असाल तर तुम्ही दिवसातून किती आणि किती अंडी खाल्ली पाहिजेत?
एनसीबीआयच्या अहवालानुसार, एका दिवसात २ अंडी खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो. रोज अंडी खाल्ल्याने शरीरातील लाल रक्तपेशी वाढतात. अंडी खाल्ल्याने शरीराला प्रथिने आणि जीवनसत्त्वे मिळतात. त्यामुळे बराच वेळ भूक लागत नाही. निरोगी व्यक्तीने दररोज २ अंडी खावीत असे अनेक संशोधनात म्हटले आहे.
वाचा: एकाच जागी जास्त वेळ बसल्यामुळे तुमच्याही हाता-पायांना येतात का मुंग्या? जाणून घ्या कारणं
अंड्यांमध्ये पोषक घटक –
अंड्यांमध्ये कोलीन देखील आढळते, जे मेटाबॉलिजम करण्यास मदत करते .एक अंड्यामध्ये सुमारे ७५ कॅलरीज, ५ ग्रॅम फॅट, ६ ग्रॅम प्रथिने, ० कार्बोहायड्रेट आढळते. अंडी व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी १२ चा चांगला स्रोत आहे. .
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! तब्बल 5 वर्षानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
अंडी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढते का?
उच्च कोलेस्टेरॉल असलेल्या रुग्णांमध्ये हृदयाच्या समस्यांचा धोका वाढतो, ज्यामुळे तुमचा जीव धोक्यात येऊ शकतो. अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की अंड्यांमध्ये आढळणारे कोलेस्ट्रॉल शरीरावर कोणताही परिणाम करत नाही. मात्र हे तुम्ही अंडी कशाप्रकारे खाता यावर अवलंबून आहे. जर तुम्ही अंडी भरपूर तेलात किंवा बटरमध्ये बनवून खात असाल तर या दोन गोष्टी मिळून नुकसान करू शकतात. किती आणि कशी अंडी खावीत?
हृदयरोगींनी अंडी खावीत?
हृदयरोगी दिवसातून एक अंडे खाऊ शकतात.मात्र खाताना अंड्याचा फक्त पांढरा भाग खाण्याचा प्रयत्न करा. यामुळे कोलेस्टेरॉल वाढणार नाही आणि शरीराला प्रोटीन मिळेल. जर तुम्ही अंडी जास्त प्रमाणात खात असाल तर अंड्यातील पिवळ बलक खाऊ नका. अंडी हृदयासाठी नुकसान करू शकत नाही.
Web title: Does eating eggs cause heart disease patients? Know how many eggs to consume in a day..
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा: