कृषी बातम्या

शेतीकामासाठी यंत्राचा वापर करताय? तर ही काळजी घ्या, अपघात होण्यापासून टळतील…

शेतकर्यांची बरीच कामे यंत्राद्वारे केली जातात. यामुळे कित्येक कामे लवकर होतात व वेळेची बचत देखील होते. नांगरणीपासून ते काढणीपर्यंत तसेच मळणीपर्यंत ही सगळी कामे यंत्राद्वारे केली जातात. शेतीमध्ये यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात वापरताना पाहत आहोत. यामध्ये घ्यावयाची काळजी देखील तितकीच महत्वाची आहे. यंत्राद्वारे करताना कामे कोणती काळजी घेतली पाहिजे? याविषयी आपण सविस्तर पाहुया..

वाचा –

पीक असे टाका

पीक टाकताना मळणी यंत्राचा वेग अधिक असतो. म्हणून एकापाठोपाठ पीक टाकावे लागते. पीक टाकलेले कमी पडू नये म्हणून शेतकरी वेगाने पीक टाकतो. इथे अडचणी येऊ शकतात. त्यामुळे पीक टाकताना कधी एकाने टाकू नये. यंत्रामध्ये पीक टाकण्यासाठी दोन व्यक्तीना निवडा. एक व्यक्ती पीक उचलून घेईल आणि दुसरा यंत्रामध्ये टाकेल. यामुळे अपघात टळतील

वाचा –

पीक टाकताना ही काळजी घ्या –

सोयाबीन, हरभरा, मसूर, बाजरी इत्यादी झुडपी पिके मळताना काळजी घ्यावी. पीकाची मळणी सुरु असताना अनेकदा शेतकरी हाताला जुन्या कापडाचा तुकडा किंवा पोते गुंडाळतात. हे देखील तेवढेच धोक्याचे आहे. कारण यामध्ये कापड, पोते यांचे धागे, पट्टी किंवा लोंबणारे भाग हे यंत्राच्या धुराकडे खेचले जाऊ शकतात. त्यामुळे हात आत जाऊन अपघात होऊ शकतो. हातात रबरी किंवा चामड्याचे हातमोजे घालावेत.त्यामुळे ही कामे काळजीपूर्वक करता येतील. काम केल्यानंतर विश्रांती घेणे गरजेचे आहे. सलग कोणतेही काम करू नका.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button