इतर

तुम्ही क्रेडिट कार्ड वापरता का? जाणून घ्या क्रेडिट कार्ड चे हिडन चार्जेस..

Do you use a credit card? Find out the hidden charges of credit card.

अलीकडील काळात मोठ्या प्रमाणात लोकांकडून क्रेडिट कार्ड (Credit card) किंवा डेबिट कार्ड(Debit card) या मोठ्या प्रमाणावर वापर होताना दिसतो. कोरोनाच्या काळामध्ये क्रेडिट कार्डामुळे हातात पैसे नसतानाही खरेदी करता येते . याशिवाय, क्रेडिट कार्डसच्या वापरावर मिळणारी डिस्काऊंट (Discount) आणि कॅशबॅक (Cashback) मिळत असल्याने अनेक लोकांच्या पसंतीस उतरत आहे. (Know about Credit Card use and charges)

मात्र, क्रेडिट कार्डवरुन बिनधास्त शॉपिंग (Shopping) करताना काही गोष्टींचे भान बाळगणे अत्यंत गरजेचे असते. अन्यथा तुम्हाला मोठा आर्थिक फटका (Financial blow) बसू शकतो. क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांना अनेकदा त्यावरील हिडन चार्जेस (Hidden charges) आणि तत्सम गोष्टींची माहिती नसते. त्यामुळे क्रेडिट कार्डचा अतिवापर हा आर्थिक संकटाला कारणीभूत ठरू शकतो, चला तर जाणून घेऊया क्रेडिटकार्ड मधील चार्जेस..

हे ही वाचा : भारतीय लोक स्मार्टफोन खरेदी करताना, ‘या’ गोष्टींना सर्वाधिक महत्त्व देतात..

क्रे़डिट कार्ड घेताना त्यावर वार्षिक शुल्क (Annual fee) घेतली जाते की नाही, हे तपासून घेणे गरजेचे आहे. प्रत्येक कंपनीचे वार्षिक शुल्कही वेगळे असतात. क्रेडिट कार्डसच्या प्रकारानुसार वार्षिक शुल्क आकारले जाते. हे शुल्क 500 ते 3000 रुपये इतके असू शकते. दरवर्षी हे पैसे भरणे बंधनकारक असते. अनेकदा क्रेडिट लिमिट वाढवण्याच्या नादात आपल्याला जादा वार्षिक शुल्क भरावे लागू शकत

अनेकदा आपण पेटीएम (Paytm) किंवा अन्य एखाद्या डिजिटल वॉलेटमध्ये (In a digital wallet) पैसे भरण्यासाठी क्रेडिट कार्डाचा वापर करतो. मात्र, या व्यवहारासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जाते. क्रेडिट कार्डामधून तुम्ही पैसे काढू शकता. मात्र, त्यासाठी प्रचंड व्याज आकारले जाते. त्यामुळे क्रेडिट कार्डातून मोठी रक्कम काढताना नेहमीच काळजी बाळगणे गरजेचे आहे.

हे ही वाचा : वैयक्तिक कर्ज घेण्याच्या विचारात आहात का? मग तुलना करा, कोणत्या बँकेचे किती व्याजदर आहे…

तुम्ही क्रेडिट कार्डाचे बिल (Bill) वेळेवर भरायचे लक्षात राहत नाही, दिलेल्या तारखेपर्यंत क्रेडिट कार्डाचे बिल न भरल्यास मोठी अडचण होऊ शकते. ड्यू डेट उलटून गेल्यानंतर पैसे भरायला गेल्यास त्यावर बराच दंड आकारला जातो.वार्षिक गणिताच्या आधारे तुलना केल्यास तुमच्याकडून 30 टक्के दंड (Penalty) आकारला जातो.

तुम्ही क्रेडिट कार्डसच्या सेवांचा वापर (Use of services) करता तेव्हा त्यावर जीएसटी लागतो. आगामी काळात क्रेडिट कार्डसंबधी सेवांवर 15 टक्के जीएसटी (GST) आकारला जाऊ शकतो. त्यामुळे तुमच्या खर्चात वाढ होऊ शकते. ज्याप्रकारे क्रेडिट कार्ड मुळे तुमचे सिबिल रेकॉर्ड (CIBIL RECORD) वाढण्यास मदत होते त्याचप्रमाणे क्रेडिट कार्ड मुळे तुमचे सिबिल रेकॉर्ड खराब देखील होऊ शकते, तुम्हाला जेव्हा खरंच कर्जाची (Of debt) आवश्यकता असेल त्यावेळी अडचण येऊ शकते.

हे ही वाचा : ऑनलाइन शॉपिंग खरेदी करताना, घ्या ‘अशी’ काळजी!

त्यामुळे खर्च करताना विचारपूर्वक खर्च करा, तसेच क्रेडिट कार्ड वापरताना, चार्जेसही विचार करा, बऱ्याच वेळेला डिस्काउंट व आकर्षक ऑफर्समुळे आपण नाहक खरेदी करून बसतो, व त्यामुळे सेविंगच्या बजेट मध्ये घट होऊ शकते. आवश्यक तिथे क्रेडिट कार्डचा वापर करा, परंतु त्याचा अतिरेक टाळा.

हे ही वाचा :

1. वैयक्तिक कर्ज घेण्याच्या विचारात आहात का? मग तुलना करा, कोणत्या बँकेचे किती व्याजदर आहे…

2. जाणून घ्या ऊस शेतीसाठी वापरण्यात येणारी आधुनिक यंत्रे व त्याचा उपयोग…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button