हे झाड पाहिलत का? या झाडाला मिळतंय २४ तास संरक्षण, देखरेखीवर केला जातोय तब्बल १५ लाख रुपये खर्च..
भारतातील हे झाड माहित आहे का? या झाडाला २४ तास संरक्षण दिले जाते. २१ सप्टेंबर २०१२ या दिवशी श्रीलंकेचे तत्कालीन राष्ट्रपती महिंद्रा राजपक्षे यांनी या बोधीवृक्षाचं रोपण केलं होते. अशी माहिती आहे. यांनी भारत भेटीवर असताना हा वृक्ष लावला होता. या झाडाविषयी आपण सविस्तर माहिती पाहूया..
वाचा –
या झाडाला बौद्ध धर्मात अधिक महत्व असल्याने या झाडाची अधिक काळजी घेतली जात आहे. या झाडाच्या देखभालीसाठी वर्षाला तब्बल १५ लाख रुपये खर्च केला जातो. तसेच या झाडाचे १५ दिवसानंतर मेडिकल चेकअप केले जाते.
वाचा –
सुरक्षा अशी केली जाते –
या झाडाभोवती १५ फुट उंच जाळीचे संरक्षण दिले आहे. या भोवती दोन सुरक्षा रक्षक पहारा देण्यासाठी असतात. झाडाची काळजी चांगली घेतली जाते. झाडाला इजा पोहचवू नये अशी सुरक्षा प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. १५ दिवसांनी या झाडाची पाहणी करून खत पाण्याची सोय केली जाते. रायसेन जिल्ह्यात सांची हे एक पर्यटनस्थळ आहे. अनेक वर्षांपूर्वी इथं बौद्ध युनिव्हर्सिटीची स्थापना करण्यात आली होती. याच विद्यापीठाच्या डोंगरावर हा वृक्ष लावण्यात आला आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा