दुग्ध व्यवसाय करताय? तर हिवाळ्यात जनावरांची अशी काळजी घ्या; उत्पादनात होईल वाढ..
शेतकऱ्यांसाठी महत्वाचा व उत्पादनाचा व्यवसाय असलेला दुग्ध व्यवसायाचे योग्य नियोजन करणे गरजेचे असते. हिवाळ्यात दुधाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे या काळात योग्य काळजी घेणे गरजेची. थंडीच्या दिवसात जनावरांना छोटे मोठे आजार होऊ शकतात. याचा परिणाम दूध उत्पादनावर होतो. यावर नियंत्रण कसे करता येईल हे आपण सविस्तर पाहूया…
वाचा –
अतिथंडीमुळे होणारे नुकसान –
थंडीच्या दिवसात बऱ्याच जनावरांचे पोट गच्च होते व रवंथ प्रक्रिया मंदावते. तसेच थंडीमद्धे ऊर्जेची आवश्यकता जाणवते व या काळात अधिक चाऱ्याची गरज पडते. चारा जास्त प्रमाणात देण्याचा प्रयत्न करा. दुधाच्या उत्पादनात वाढ होईल. तसेच हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण जास्त असावे. पाण्याचे प्रमाण अधिक वाढवल्याने दूध उत्पादनात घट होण्यापासून वाचते.
वाचा – “या” जातीची गाय माहीत आहे का? शेतकऱ्यांसाठी ठरतेय फायदेशीर, तब्बल एवढे लिटर दूध देते.
हिवाळ्यात उपाययोजना –
१) हिवाळ्यात जनावरांच्या गोठ्यामद्धे जास्त वॅट चे बल्ब लावा. तसेच थंडीचे दिवस असतील त्यामुळे गोठा पूर्ण मोकळा ठेवू नका.
२) हिवाळ्यात पडदे लावून चारही जागा बंद ठेवण्याचा प्रयत्न करा.
३) थंडीपासून मुक्तता मिळायला हवी याची काळजी घ्या.
४) तसेच जास्त उर्जेसाठी पोषक चारा देण्याचा प्रयत्न करा.
५) गोठयातील पाणी , मूत्र निघून जाण्याची योग्य सोय करा.
६) हिवाळ्यात सडाला भेगा पडण्याची शक्यता असते. अशावेळी तत्काळ उपचार करा.
७) सडाची त्वचा मवू होण्यासाठी ग्लिसरीन चा वापर करा.
८) धार काढताना कास धुण्यासाठी गरम-कोमट पाण्याचा वापर करा.
हिवाळ्यात या रोगापासून जनावरांची काळजी घ्या –
लाळ्या खुरकूत या साथीच्या रोगापासून जनावरांचे संरक्षण करा. अशावेळी योग्य काळजी घ्या व लसीकरणाचा वापर करा.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा