तुम्हाला देशातील सर्वाधिक महाग भाजी कोणती आहे माहित आहे का? ‘या’ राज्यामध्ये पिकते ही भाजी, किंमत वाचून व्हाल हैराण…
Do you know which is the most expensive vegetable in the country? This vegetable grows in this state, you will be annoyed by reading the price.
घरातील गृहिणीचे सर्व बजेट भाजीवर अवलंबून असते, भाज्यांची किंमत वाढली तर घरातील बजेट देखील वाढत असते. परंतु आपल्या देशातील सर्वाधिक महाग भाजी कोणती आहे हे माहित आहे का? छत्तीसगड (Chhattisgarh) राज्यामध्ये देशातील सर्वाधिक महाग भाजी पिकवली जाते, सरासरी या भाजीचा बाजार भाव 2000 प्रति किलो इतका आहे. चला जाणून घेऊया सर्व माहिती.
कुठे पिकवली जाते हि भाजी..
छत्तीसगड राज्यांमध्ये पिकवली जाणारी सराई बोडा (Sarai Boda) सर्वात महाग भाजी म्हणून ओळखली जाते, शक्यतो ही भाजी धमतरी जंगलात (Dhamtari Forests) पिकविली जाते. आसपासच्या खेड्यांमध्ये ही भाजी 300 रुपये किलोला विकली जाते. छत्तीसगडमधील शहरांमध्ये 600 रुपये किलोला आणि देशातील इतर भागात 2000 रुपये किलोपर्यंत विकली जाते.
वाचा: भारतातील ‘या’ झाडाची किंमत आहे सोन्यापेक्षाही महाग, वाचा तुम्हाला कशी मिळेल सुवर्णसंधी..
एवढी महाग का असते ही भाजी?
सराई बोडा या भाजीमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात प्रोटीन, कार्बोहाइड्रेट आणि खनिजे (Proteins, carbohydrates and minerals) आढळत असतात त्याचप्रमाणे पोटाचे विकार, हृदया संबंधीच्या आजार (Stomach disorders, heart related diseases) यावर ही भाजी अत्यंत उपयुक्त ठरते. आदिवासी बांधवांच्या जेवणामधील हा एक महत्त्वाचा घटक मानला जातो.
‘शोरिया रोबस्टा’ (‘Shoria Robusta’) हे या भाजीचे शास्त्रज्ञांनी ठेवलेले नाव आहे, ‘बोडा’ याचा अर्थ बुरशी (Fungus) असा होतो, हे नाव आदिवासींनी(By the tribals) ठेवले असून त्याच्यावर त्यांची उपजीविका
चाललेली आहे. पहिल्या पावसापासून माती ओली झाल्यावर सालच्या झाडाची मुळे विशिष्ट प्रकारचे द्रव सोडतात. यानंतर, या बुरशीचे साल जमिनीवर पडलेल्या कोरड्या पानांखाली तयार होते, ज्याला बोडा म्हणतात. या भाजीला जंगलातील काळे सोने (Black gold) म्हणून देखील ओळखले जाते.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा: