उस उत्पादकासाठी फायदेशीर असणारी “ही” उसाची जात माहीत आहे का ? पहा उत्पन्न, फायदे व वैशिष्ट्ये..
Do you know "this" variety of sugarcane which is beneficial for sugarcane grower? See income, benefits and features ..
शेतकऱ्यांच्या फायद्याचा असणाऱ्या या उसाच्या जातीचे संशोधन (sugarcane research) करण्यात आले. शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळावे उसातून काही नुकसान होऊ नये म्हणून संशोधन चालू आहे. तसेच हा वाण फायदेमंद असल्याचं देखील सांगितलेलं आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (Vasantdada Sugar Institute) च्या 12121 (VSI 08005) या ऊस वाणास दक्षिण भारतातील नऊ राज्यांमध्ये प्रसारित करण्यास केंद्रीय बियाणे समितीने 28 जुलै ला मान्यता दिली होती.
संशोधनानंतर VSI 12121 (म्हणजेच व्ही. एस. आय 08005) ही ऊस जात महाराष्ट्रात प्रसारित करण्यास बियाणे उपसमितीने 2018 मध्ये मान्यता दिली होती. आता हीच 18 संशोधन चाचणीमध्ये (EXPERIMENT) या उसाची जात इतर वाणापेक्षा सर्वश्रेष्ठ ठरलेली असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यांनी चाचणी केलेला आता हा वाण महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, तेलंगणा, आंध प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ याठिकाणी प्रसारित करण्यासाठी मार्ग मोकळे झालेले असल्याचं सांगितले आहे.
चांगला वाढणारा तसाच मध्यम परिपक्व होणार ऊस त्याचबरोबर जास्त खोडवा देणारा, पाण्याचा त्रास सहन करणारा व मोठ्या प्रमाणात साखर उतारा देणारा ऊस वाणा असल्याचं चाचणीत सिद्ध झाले आहे. याचबरोबर व्हीएसआयच्या प्रक्षेत्रावर चाचण्या घेताना या ऊस वाणाचे मूळ नाव व्हीएसआय 08005 असल्याचं देखील स्पष्ट केलं आहे.
मशिन एक काम अनेक: मल्टी हार्वेस्टर सहित शेतीतील दगड बाहेर काढण्याची मशीन; पहा विडिओ व वैशिष्ट्ये..
ऊस प्रजनन केंद्रावर चाचण्या –
ऊस प्रजनन केंद्र सुरू करून यांनी नवीन उसाच्या जातीचे निर्मितीचे काम मोठ्या गतीने व्हीएसआयने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे सुरू केलेले आहे.
चाचण्या केल्यानंतर 12121 जातीच्या उसाचे उत्पादन हेक्टरी 124.70 टन व साखर उत्पादन 18.22 टन इतके मिळाले. दक्षिण भारतातील सर्व चाचण्यांमध्ये हे उत्पादन तुल्य वाणांपेक्षा 25 ते 30 टक्क्यांनी जास्त मिळत असल्याचे सांगितले आहे. 12121 या जातीमध्ये सरासरी रसातील साखरेचे प्रमाण 20.07 टक्के मिळाले. हेच जास्त साखर उपयोगाचे असल्याचं सांगितले आहे.
इ-पिक पाहणीच्या माध्यमातून अँपवरती घरबसल्या आपल्या पिकांची नोंद कशी कराल? वाचा सविस्तर…
या उसाची प्रमुख वैशिष्ट्ये –
उसावर जो लाल रंगाचे टिपके किंवा रोग आल्यासारखा जाणवतो त्या रोगाला हा ऊस बळी पडत नसल्याचं सांगितलं आहे. याचबरोबर उसामध्ये चोथा जास्त असल्याचा सांगितलेला आहे त्यामुळे कोल्हे , घुशी , उंदीर या पिकाला कुरतडत नाहीत. त्यामुळे उस सुरक्षित हानी न होता चांगला राहतो. ऊस तीनही हंगामात होतो आणि जास्त प्रमाणात मराठवाडा व विदर्भात तसेच खानदेशात आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा :