पशुसंवर्धन
ट्रेंडिंग

“या” जातीची गाय माहीत आहे का? शेतकऱ्यांसाठी ठरतेय फायदेशीर, तब्बल एवढे लिटर दूध देते.

Do you know "this" breed of cow? It is very beneficial for the farmers, it gives a huge amount of milk.

शेतकऱ्यांना पशुपालन (animal husbandry) अधिक प्रमाणात परवडते. पशुपालनाचा (animal husbandry) चांगला व्यवसाय देखील होतो. हा व्यवसाय करताना दुधाच्या जातींच्या गायी घेणे किंवा ओळखणे गरजेचे आहे. दुधाच्या जातींचे पालन करून चांगला व्यवसाय पुढे नेऊ शकता. तर या जातीं कोणत्या? हे शेतकऱ्याने जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे.

वाचा: ड्रोनचा वापर शेतीसाठी फायदेशीर; शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याकडे केंद्र सरकारचे लक्ष..

डांगी गाईच्या जातीविषयी-

पशुपालनात (animal husbandry) अनेक नवीन जाती पाहायला मिळतात. आपण आज ऐका स्पेशल जातीच्या गाईविषयी माहिती पाहणार आहोत. या जातीचे नाव आहे डांगी. ही जात गुजरात प्रमाणे महाराष्ट्रातील नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात आणि पश्चिम घाटामध्ये देखील आढळते. गुजरातच्या डांग भागावरूनच ह्या जातींचे नाव डांगी पडले. गायीचा रंग पांढरा भडक असतो. तसेच गाईच्या शरीरावर लाल किंवा काळे डाग असतात, तर शरीर मध्यम आकाराचे असते. ह्या जातीच्या गाईचे डोके लहान असते आणि मानेची कवळी लटकलेली दिसते. कान लहान असतात आणि खांद्याचा आकार मध्यम असतो.

वाचा: “या” जिल्ह्यातील शेळी, गाई-म्हैस सह या गटासाठी वाटप योजना अर्ज सुरू; असा करा अर्ज, “हे” आहेत लाभार्थी..

डांगी गाईचा आहार –

कडधान्य – मका, बार्ली, ज्वारी, बाजरी, चणे, गहू, ओट्स, कोंडा, तांदूळ, कॉर्न भुसी, कोरडे धान्य, भुईमूग, मोहरी इ.

हिरवा चारा – बर्सीम, ल्युसर्न, चवळी, गवारचा पाला, ज्वारी, बाजरी, हत्ती गवत, नेपियर बाजरी, सुदान गवत इ.

सुका चारा – बेरसीमचे कोरडे गवत, वेसणाचे कोरडे गवत, ओट्सचे कोरडे गवत, खडे, कॉर्न फ्लेक्स, ज्वारी आणि बाजरी, उसाचे पाचट, दूर्वाचे कोरडे गवत, मक्याचा सुका कडबा इ.

डांगी गाईची दुध उत्पादन क्षमता…

दुग्ध उत्पादन क्षमता 1200 ते 1250 किलो प्रति व्यात असते. ह्या जातीच्या गाई 100 ते 400 दिवस दुध उत्पादन देण्यास सक्षम आहे. दुधातील चरबी सुमारे 4.3 टक्के असते.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे ही वाचा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button