दुधामधील भेसळ ओळखण्याच्या “या” टिप्स माहीत आहेत का? नसेल माहीत तर पहाच..
सध्या दुधामध्ये (milk) भेसळीच्या अनेक प्रकरणे समोर येत आहेत. दूधच नाहीतर असे बऱ्याच जीवनावश्यक गोष्टी आहेत की ज्यांचा मध्ये भेसळ केली जाते. आपल्याला ती समजत नाही. परंतु असे भेसळयुक्त पदार्थ खाल्ल्याने अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. या लेखामध्ये आपण दुधामधील (milk) भेसळ कशी ओळखावी? याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया..
वाचा –
पाणी मिसळलले दूध असे ओळखा-
दुधात पाणी मिसळणे हे सर्रासपणे चालणारी पद्धत आहे. दुधात (milk) पाणी मिसळले आहे का हे तपासण्यासाठी उतार असलेल्या भागावर दुधाचा थेंब टाकावा. दूध जर शुद्ध असेल तर टाकलेला एक थेंब हळू हळू पांढरी रेषसोडत पुढे जाईल.जर दुधा मध्ये पाणी मिसळले असेल तर दूध कुठल्याही प्रकारची खूणन सोडता पुढे वाहून जाते.
स्टार्च मिसळलेले दूध:
लोडीनया रसायनाच्या सोलुशन मध्ये दुधाचा एक थेंब टाका. दुधाचा थेंब टाकल्या नंतर हे मिश्रण निळे झाले तर दुधात स्टार्च मिसळले आहे हे समजावे.
वाचा –
युरिया मिसळलेले दूध:
दुधामध्ये युरिया आहे की नाही हे तपासण्यासाठी एका टेस्ट ट्यूब मध्ये एक चमचा दूध घ्यावे. यामध्ये अर्धा चमचा तुरीच्या डाळीचे किंवा सोयाबीनचे पावडर टाकावी. पाच मिनिटानंतर या मिश्रणात एक लाल लिटमस पेपर चा तुकडा टाकावा. कागदाचा तुकडा निळा झाला तर समजा या दुधात युरिया मिसळलेला आहे.
डिटर्जंट:
दुधामध्ये डिटर्जंट मिसळले आहे की नाही हे तपासण्यासाठी पाच ते दहा मिली दुधात तितकेच पाणी मिसळावे. हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यावे. या मिश्रणात फेस आला तर समजावे दुधाचा धुण्याची पावडर अथवा डिटर्जंट मिसळण्यात आला आहे.
सिंथेटिक दूध:
सिंथेटिक दुधाला कडवट चव असते. तसेच सिंथेटिक दुधाचा थेंब बोटावर घेऊनचोडल्यास साबना सारखे वाटते आणि गरम केल्यानंतर हे दूध पिवळे होते. दुकानात युरियस पट्टी च्या साहाय्याने या दुधात कृत्रिम प्रथिनयुक्त पदार्थ आहे का हे तपासले जाऊ शकते. या पट्टी सोबत मिळणारी रंगांची सूची दूधात भेसळ आहे की नाही ते सांगते.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा