मुळा शेती लागवडीच्या सोप्प्या पध्दती माहीत आहेत का? यातून मिळेल भरघोस उत्पन्न, करा अशी लागवड..
अलीकडे मुळा शेतीचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे मुळा मागणीत वाढ झाल्याची दिसून येत आहे. जेव्हा बाजारात मुळा (radish) कमी येतो तेव्हा लोकांना याची कमतरता दिसू येते व यानुसार दरामध्येही प्रचंड वाढही केली जाते. आणि या कालावधीमध्ये मुळा शेतीची लागवड (radish cultivation) केली तर अधिक फायदेशीर होऊ शकते. उत्पादनाचे अधिक उत्पादन काढू शकता. मुळा शेती लागवडीबद्दल सविस्तर माहिती घेऊया..
वाचा –
मुळ्या शेतीसाठी तापमान –
मुळ्याची वाढ 20 ते 25 अंश सेल्सिअस तापमानाला झपाट्याने होते; परंतु चांगला स्वाद आणि कमी तिखटपणा येण्यासाठी मुळ्याच्या वाढीच्या काळात 15 ते 30 अंश सेल्सिअस तापमान असावे.
जमीन कशी असावी –
वाढ चांगली होण्यासाठी लागवडीसाठी जमीन भुसभुशीत असावी. योग्य मशागत करा नाहीतर मुळ्याचा आकार वाकडा होत व त्यावर असंख्य तंतू मुळे येतात. मुळ्याची लागवड अनेक प्रकारच्या जमिनीत करता येत असली, तरी मध्यम ते खोल भुसभुशीत अथवा रेताड जमिनीत मुळा चांगला पोसतो. चोपण जमिनीत मुळ्याची लागवड करू नये.
वाचा –
मुळा जाती –
पुसा हिमानी, पुसा देशी, पुसा चेतकी, पुसा रेशमी, जपानीज व्हाईट, गणेश सिथेटिंग या मुळ्याच्या आशियाई किंवा उष्ण समशितोष्ण हवामानात वाढणार्या जाती आहेत.
अधिक उत्पादनासाठी घ्यावयाची काळजी –
मुळ्याचे पीक कमी कालावधीत तयार होते. अधिक उत्पादन मिळण्यासाठी या पिकाला खते वेळेवर द्यावीत. जमिनीची मशागत करताना चांगले कुजलेले शेणखत 25 टन दर हेक्टरी जमिनीत मिसळून द्या. कोरड्या जमिनीत मुळ्याची पेरणी करू नका. बियांची पेरणी केल्यानंतर लगेच हलके पाणी द्या.
मुळा लागवड –
मुळ्याची विक्रीसाठी लागवड रब्बी हंगामात केली जाते. रब्बी हंगामासाठी सप्टेंबर ते जानेवारी या कालावधीत बियांची पेरणी करा.
1) मुळ्याची लागवड करताना दोन ओळीतील अंतर 30 ते 45 सें.मी. आणि 2 रोपांमधील अंतर 8 ते 10 सें. मी. ठेवा.
2) मुळ्याची लागवड सपाट वाफ्यात किंवा सरी वरंब्यावर केली जाते. दोन वरंब्यामधील अंतर मुळ्याच्या जातीवर अवलंबून असते.
3) युरोपीय जातीसाठी हे अंतर 30 से. मी. ठेवतात, तर आशियाई जातीकरिता 45 सें. मी. इतर ठेवतात. वरंब्यावर 8 से.मी. अंतरावर 2-3 बिया टोकन करून पेरणी करतात. सपाट वाफ्यात 15-15 सें. मी. अंतरावर लागवड करतात.
4) बियांची पेरणी 2-3 से.मी. खोलीवर करावी. पेरणीपूर्वी जमिनीत ओलावा असावा. कमी अंतरावर लागवड केल्यास मध्यम आकाराचे मुळे मिळून उत्पादन जास्त मिळते. मुळ्याच्या एक हेक्टर लागवडीसाठी 10 ते 12 किलो बियाणे लागते.
वाचा –
किडीवर नियंत्रण उपाय –
मावा या किडीचा उपद्रव ढगाळ हवामानात जास्त प्रमाणात होतो. तसेच काळी अळी ही प्रमुख कीड असते. या किडीची पिल्ले तसेच प्रौढ किडे पानांतील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे पाने गुंडाळली जातात. रोप कमजोर होण्याची जास्त शक्यता असते. या किडीच्या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्यात 20 मिलिलिटर मॅलॅथिऑन मिसळून पिकावर फवारा.
हे ही वाचा –