चांगली शेती (Agriculture) करण्यासाठी चांगल्या जमिनीची देखील अत्यंत गरज असते. आपण पाहतो की पिकासाठी शेतकरी खूप मेहनत घेत असतो. पण त्याला हवं तसे कित्येकदा उत्पादन शेतातून निघत नाही. त्यासाठी पोषक मातीही तितकीच गरजेची. यासाठी मातीची चाचणी (Soil testing) देखील केली जाते. शेतकऱ्यांचा आता हा त्रास कमी होणार आहे. घरीच करू शकणार फक्त 7 रुपयामध्ये जमीनीतील कीडनाशके तपासणी. लवकरच येणार नवीन तंत्रज्ञान. याविषयी आपण सविस्तरपणे पाहूया –
प्रयोज शाळांचा, महागड्या उपकरणांचा आता खर्च वाचणार..
माती चाचणीसाठी प्रयोज शाळांमध्ये जाऊन खर्च करावा लागतो. काही उपकरणे वापरावी लागतात. येण्या-जाण्यासाठी वेगळा त्रास. आता या सगळ्यांपासून सुटका मिळणार आहे. आपल्या शेतातील कीडनाशके (Pesticide inspection) काही सेकंदात सांगणार हे नवीन यंत्र. कोणत्याही व्यक्तीला काचेही पट्टी वापरून 5, 7 रुपयात हे यंत्र वापरण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पेटंटची प्रक्रिया शेवटच्या टप्यात आहे व याचे प्रोविजनल प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे.
- मोठी बातमी: अखेर 2021 चा पीकविमा झाला मंजूर; वाचा ते ६ भाग्यवान जिल्हे कोणते?
- केंद्र सरकारचा मोठा निर्णय; आता टोमॅटो विक्रीचा प्रश्न मिटला, वाचा काय घेतला निर्णय?
शेतकऱ्यांनो घरी बसून 72 तासांच्या आत नुकसानीची सूचना विमा कंपन्यांना द्या; ती कशी? वाचा सविस्तर
किडनाशकांमुळे मानवी व पर्यावरण आरोग्याला धोका..
माती, पाण्यामध्ये कीडनाशकांचे प्रमाण अधिक असते. मानवाला व पर्यावरणाला या त्रासाला सामोरे जावे लागते. आरोग्याच्या समस्याही उद्भवत असतात. शेत मालाची परदेशात निर्यात करताना रासायनिक अवशेषांचे तपासणी करतात. हे फक्त बाहेरपुरते. एरवी पाणी, माती तपासणीसाठी कोण खर्च करणार? त्याचा खर्चही मोठा. त्यामुळे तपासणी बाबत कोणी समोर जात नाही.
सध्या कर्करोग (Cancer) व बाकी रोगांचे प्रमाण वाढले आहे. याचा विचार करून कृषी विद्यापीठातील पंजाबच्या संशोधकांनी पाणी व माती यातील कीडनाशके सांगणारे तंत्रज्ञान तयार केले आहे. फक्त केवळ 5 ते 7 रुपये या किटची किंमत आहे. एका नमुनासाठी फक्त एक पट्टी वापरायची. हे नवीन तंत्रज्ञान सर्वांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
विद्यापीठांनी पंजाब सरकार सोबत या तंत्रज्ञानासाठी करार केला आहे. यानंतर किडीच्या उपलब्धते बाबत सरकारचा निर्णय गरजेचा असल्याचे दिसत आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे ही वाचा-