तुमचे SBI मध्ये खाते आहे का? सावधान! आज नाही करता येणार तुम्हाला UPI वरून पेमेंट; पहा काय आहे हे प्रकरण…
सध्या सगळीकडे ऑनलाईन खरेदी/विक्री करण्यावर भरपूर जागी भर दिला जातो. मग ते छोटे चहा चे दुकानापासून, ते मोठया दुकानापर्यंत. कोरोनाच्या काळामध्ये तर UPI व्यवहार खुप करण्यात आले. त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank of India ) ने आज 14 मार्च ला UPI तंत्रज्ञान सुधारणा करण्यासाठी आज सेवा बंद केली आहे. (Sbi Important notice sbi users cannot do upi payment today on 14th march due to online platform upgraded) असे सकाळी SBI कडून सांगण्यात आले आहे.
अलिकडच्या काही वर्षांत डिजिटल पेमेंटचा ट्रेंड मोठ्या वेगवान वाढला आहे. विशेषत: कोरोना युगात, यूपीआय (UPI Transaction) पासून शहरातून दुसऱ्या गावात व्यवहार वाढले आहेत.
म्हणजे जर तुमचे खाते एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर आज तुम्ही 14 मार्चला यूपीआय पेमेंट करू शकणार नाही. यूपीआय पेमेंट करण्यात एसबीआय वापरकर्त्यांना (SBI Users) अडचण येऊ शकते. देशातील या बड्या सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) संबंधित माहिती (SBI Important Notice) ट्विट करुन माहिती दिली आहे.
एसबीआयने ट्विट केलेल्या माहितीनुसार, 14 मार्च रोजी बँक ग्राहकांच्या चांगल्या सोयीसाठी बँक आपलं यूपीआय प्लॅटफॉर्म सुधारत आहे. 14 मार्च रोजी झालेल्या अपग्रेडमुळे एसबीआय ग्राहकांना बँकेचा यूपीआय प्लॅटफॉर्म वापरण्यास अडचणी येऊ शकतात असे बँकेने म्हटले आहे. तर यावर बँकेने पर्यायही सांगितले आहेत:-
अश्या वेळी तुम्ही ह्या सुविधा वापरा :
यावेळी एसबीआय वापरकर्ते योनो अॅप (Yono App), योनो लाइट अॅप (Yono Lite App), नेट बँकिंग (SBI Net banking) किंवा एटीएम (ATM) वापरू शकतात अशीही माहिती बँकेने दिली आहे. अपग्रेडमुळे तुम्हाला यूपीआय सेवा वापरण्यात अडचण येत असल्यास तुम्ही या सेवा वापरू शकता. तसेच युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने (UFBU) दोन दिवसांचा संप पुकारला आहे.
संपामुळे 15 आणि 16 मार्च रोजी बँकेच्या शाखा पूर्णपणे बंद राहिल्यास बँक शाखांचे कामकाज ठप्प होईल. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) असेही म्हटले आहे की या संपामुळे बँकेच्या कामावर परिणाम होऊ शकेल. (SBI important notice SBI users cannot do upi payment today on 14th march due to online platform)
WEB TITLE: Do you have an account with SBI? Be careful! You can’t do it today from UPI Payment; See what’s the matter