पावसाळ्यात उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर बहुतांशी शेती कमी कालावधीची पिके घेतली जातात पण ती योग्य पिकांचे योग्य नियोजन केल्यास चांगल्या आर्थिक गणित बसवता येते हे करडे येथील शिरूर तालुक्यातील भाऊसाहेब पळसकर यांनी सिद्ध करून दाखवले आहे. पळसकर हे प्रयोगशील शेतकरी आहेत व दोघे भाऊ मिळून शेती करतात. त्यांच्याकडे वडिलोपार्जित शेती आहे
*कांदा शेतीचे नियोजन कसे केले
१) दरवर्षी खरीप व रब्बी हंगामात कांद्याची लागवड केली.
२)खरीप हंगामासाठी जून महिन्यात रब्बी हंगामासाठी सप्टेंबर महिन्यात रोपवाटिका तयार केली.
३) रोपवाटिकेसाठी घरीच उपलब्ध असणाऱ्या समर्थ आणि गावरान जातीच्या बियांचा वापर केल्या.
४) ऑक्टोबर महिन्यात लागवड केल्यामुळे पाच महिन्यात वीज उत्पन्न झाली.
५ )बियांची काढणी करून हाताने मळणी करून पंधराशे रुपये प्रति किलो दराने बियाण्याची विक्री केली.
६) कांद्याचे आर्थिक गणित बसवण्यासाठी प्रति वर्षी किती एकर कांदा करायचा आहे त्यानुसार त्यांनी रोपवाटिकेची निर्मिती केली.
७) स्वतः शेतीतील लागवडीनंतर उर्वरित शिल्लक रोपांची विक्री केली यामुळे त्यांच्या आर्थिक उत्पन्नाला हातभार लागला.
*लागवडीचे नियोजन करण्यापूर्वी
👉कांदा लागवड करण्यापूर्वी जमिनीत कोंबडी खत मिसळून पूर्व मशागत केल्यास अत्यंत फायदा होतो
👉शेतामध्ये योग्य अंतरावर कांदा रोपांची लागवड करावी यामध्ये वाफे पद्धत व गादी वाफ्यावर कांदे लागण करून घ्यावी.
👉लागवडीच्या वेळेस माती परीक्षण करून त्या पिकाला हवी असणारी खते द्या.
👉लागवडीनंतर आठ दिवसांनी १९:१९:१९ ; पहिल्या खुरपणी नंतर १०;२६;२६ तसेच सिंगल सुपर फास्फेट रासायनिक खतांची मात्रा द्यावी
👉किड रोग नियंत्रणासाठी कृषी तज्ञांचा सल्ला तसेच मार्गदर्शन घ्या.
👉पाण्याची उपलब्धता मिळण्यासाठी ठिबकसिंचन तुषार सिंचन यांचा वापर करा.
👉तसेच दर्जेदार पीक येण्यासाठी काटेकोर खते व पाणी व्यवस्थापन योग्य रीतीने करा.
👉कांद्याची प्रतवारी करून लहान व मध्यम आकाराच्या कांद्याची जागेवरील व्यापाऱ्यांना विक्री करणे.
👉तसेच कांदा साठवणूक करण्यासाठी कांदा चाळ तयार करा त्याकरिता शासनाकडून अनुदान देखील उपलब्ध आहे.
👉कांदाचाळी मधील तीन-चार महिने व्यवस्थित पणे साठवून ठेवू शकतो चांगली भाव आल्यास आपण तो कांदा विकून टाकू शकतो.
👉तसेच शेती पूरक व्यवसाय करण्यास देखील प्राधान्य द्या. जसे की कुकूटपालन ,गोपालन, शेळीपालन, बांधाच्या कडेला चिंच लागवड करणे, असे केल्यास शेतीच्या आर्थिक गणित आला पुरेसे आधार मिळेल.