📌गवती चहा मध्ये व्हीटॅमिन ए, बी,सी साठा मोठ्या प्रमाणावर असतो. त्याच बरोबर फोलेट,झिंक, कॅल्शियम,कॉपर, साठा देखील असतो. गवती चहाचे अनेक फायदे आहेत.
📌गवती चहा ( lemon grass;) हे एक बारमाही प्रकारातील सुवासिक गवत आहे. हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळात मुबलक उगवते. चहाला चव येण्यासाठी थंडीच्या काळात याच्या लांब पानाचे बारीक तुकडे करून चहाबरोबर उकळून घेतात.
👉 गवती चहाच्या जाती –
लागवडीसाठी सीकेपी-२५, ओडी-१९, ओडी-२३, ओडी-२५,ओडी-४४०, आरआरएल-१६, जीआरएल-१,प्रगती, प्रमाण, कावेरी, कृष्णा, चिरहरित व निमाया जातींची निवड करावी.
सीकेपी-२५ या जातीची महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. गर्द हिरव्या रंगाची, कमी रुंदीची, फायदेशीर ठरते.
👉 अशी करा लागवड
गवती चहा लागवड अगोदर चांगली मशागत करावी. जमिनीची उभी व आडवी नांगरट करून पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणीमध्ये शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळावे. गवती चहा म्हणजे उत्तम येईल.
रोगविरहित फुटव्यांची शेतात ६०बाय ६० सें.मी.किंवा ७५ बाय ६० सें.मी. किंवा ७५ बाय ७५ सें.मी. अंतरावर लागवड करावी. गवती चहाचे पीक एकदा लागवड केल्यानंतर ४-५ वर्षांपर्यंत जमिनीत रहाते.