अळिंबी ओळख, लागवड तंत्रज्ञान आणि उन्हाळ्यामध्ये घ्यावयाची काळजी(Alimbi identification, planting techniques and care to be taken in summer)
मशरूम (आळिंबी) लागवडीसाठी चांगले स्पान (बी) तयार करून त्याची लागवड करणे हा शेतीस एक चांगला पूरक उद्दोग आहे. मशरूम (आळिंबी) लागवडीचा इतिहास खूप मनोरंजक आहे. हा उद्दोग भारतात प्राचीन काळात ग्रीक, रोमन आणि भारतीय साहित्यात पाश्चिमात्यअसल्याचा उल्लेख आढळतो. अळिंबी लागवड कशी करावी याबाबत उल्लेख प्रथम बोनिफोन यांनी सन १६५० साली केलेला आढळतो.
मशरूम (आळंबी) प्रमुख प्रकार( Major types of mushrooms)
निसर्गामध्ये अनेक प्रकारच्या व आकारच्या अळिंबी आढळतात. परंतु निसर्गात आढळणारी सर्वच अळिंबी खाण्यास योग्य असतात असे नाही, कारण सहजपणे तसे सांगता येत नाही म्हणुन निसर्गात आढळणार्या सर्वच अळिंबी खाण्यासाठी उपयोग करण्यापूर्वी ते खाण्यास योग्य आहे का नाही याची खात्री तज्ञ किंवा संशोधन केंद्रातर्फे करणे अगत्याचे आहे. त्यामुळे मशरूम लागवड करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
विषारी मशरूम (आळंबी) Poisonous mushrooms
निसर्गातील काही अळिंबीच्या जाती अती जहाल विषारी आहेत व अशा जातीचा लहान भाग जरी खाण्यात आला तरी विषबाधा व प्रसंगी मुत्यू ही होण्याची शक्यता असते. दुर्देवाने विषारी अळिंबी ओळखण्याकरिता खास असे कोणतेही वर्णन किंवा सोपी व सरळ पद्धत नाही फक्त अनुभवावरून ही गोष्ट लक्षात येऊ शकते. आशा वेळी निसर्गातील वडणार्या मशरूमचा खाण्यासाठी उपयोग करण्यापूर्वी त्या खाण्यायोग्य आहेत किंवा नाहीत याची माहितगार व्यक्तीकडून अथवा संशोधकांन कडून खात्री करून घ्यावी व नंतरच त्याचा उपयोग खाण्यासाठी करावा.
अॅमेनीटा, काप्रीनस या जातीत अति विषारी अळिंबी आढळते, विषारी अळिंबी ओळखण्याच्या द्रष्टीने काही मुद्दे महत्वाचे आहेत.
- 1. विषारी अळिंबी सक्यतो जुनाट लाकडवर वडतात, रंगाने चकचकीत असतात.
- 2. चव उग्र व न आवडण्यासारखी असते.
- 3. अळिंबीचा दांडा बिनविषारी मशरूम पेक्षा तोडण्यास जड असतो.
- 4. बिजाणू तांबूस रंगाचे असतात.
- 5. विषारी अळिंबी शिजंवताना चमचा अथवा चांदीचे नाणे संपर्कात आल्यास काळे पडते,
- 6. अळिंबीच्या दांड्याच्या बुडाशी कपाचे आकाराची गाठ असते.
वरील मुदयांचा आपण मार्गदर्शन म्हणून उपयोग करू शकतो. तसेच काही खाण्यासयोग्य मशरूमच्या बुडशी पण कप असू शकतो, त्यामुळे विषारी अथवा बिनविषारी मशरूमचा फरक दाखवण्यासाठी विश्वासाहार्य अशी माहिती नाही. म्हणूनच मशरूम शास्त्रीय पद्धतिने लागवड करणे फायद्याचे असते. खाण्यास योग्य जातीपैकी ५-६ जातीच व्यापारी तत्वावर लागवड करण्यात येते.
मशरूम लागवड का करावी … Why plant mushrooms …
- धिगंरी अळिंबीचे उत्पादन करण्यासाठी कमी भांडवल लागते.
- शेतातील जे काड जाळून टाकण्यात येते त्यावर उत्पादन घेता येते.
- कमी वेळ व कमी मजुरामार्फत व्यवसाय चालवता येत असल्यामुळे ग्राहिणीसाठी देखील हा व्यवसाय खूप पूरक मानला जातो.
- झोपडपट्टीचा निवारा अथवा कुक्कटपालनासाठी बांधण्यात आलेल्या, हवा खेळती असलेल्या निवार्याची जागाही चालते.
- धिगंरी अळिंबीचे उत्पादन व प्रक्रिया पद्धत सोपी असल्याने उच्च तंत्रज्ञानाची आवश्यकता नसते.
आळिंबीची (मशरूम) आहारातील उपयुक्तता व औषधी गुणधर्म (Dietary utility and medicinal properties of mushrooms)
- अळिंबी हे बुरशी वर्गातील असल्यामुळे त्याच्यामधील प्रथिणाचे स्वरूप व चवही वनस्पती व प्राणीजन्य प्रथिनापेक्षा भिन्न आहे.
- पचनास सोपी, सात्विक व पोष्टिकआहे.
- आळिंबीचा प्रथिनांमध्ये लायसीन व ट्रिप्टोफॅन ही महत्वाची अमिनो अॅसिड आहेत. तृणधान्यामध्ये त्यांचा अभाव असल्याने आळिंबीचा वापर केल्यास हे आवश्यक अमिनो अॅसिड शरीराला मिळतात.
- सर्व प्रकारची आम्ल मिळत असल्यामुळे मशरूमची प्रथिने भाजीपल्यातील प्रथिनापेक्षा उत्कृष्ट, चांगल्या प्रतीची व पचनास सोपी समजली जातात.
- भाजीपाला व फळे यांच्या तुलनेत मशरूम मध्ये प्रथिने, खनिजे, लोह, ताम्र, स्फुरद, पालश व कॅल्शियम इत्यादी आणि ब व क जीवनसत्त्वेचे प्रमाण दुप्पट असते.
- फोलिक अॅसिड व ब-१२ हे जीवानसत्व वनस्पतीमध्ये नसतात परंतु ही आवश्यक जीवानसत्वे मशरूममध्ये आहेत.
- अळिंबी चव मांसाहाराशी मिळती जुळती आहे तसेच त्याला स्वत:चा असा “मशरूमफ्लेवर” आहे.
- अळिंबी पुर्णपणे शाकाहारी अन्न असल्यामुळे शुद्ध शाकाहारी लोकांना एक नावीन्यपूर्ण खाद्य मिळू शकते.
- पिष्टमय पदार्थ नसल्यामुळे मधुमेह असणार्यासाठी खूप उपयुक्त.
- आहारमध्ये समतोल राखण्यासाठी व शरीरिकद्रुष्ट्या शरीर निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक ती सर्व मूलद्रवे मशरूम मध्ये आहेत.
- पिष्टमय पदार्थ व शर्करा अत्यल्प प्रमानामध्ये असल्याने उच्च रक्तदाब असणार्यांना गुणकारी व आरोग्यवर्धक आहे.
- कर्करोग, हृदयरोग, अर्धागवायु, संधिवात व मधुमेह यासाठी तर वरदानच आहे.
- हिमोग्योबिन वाढवण्यासाठी, त्वचारोग, वजन कमी करण्यासाठी व आम्लपितावर मशरूम उपयुक्त ठरते, त्यामुळेच मशरूमचा रोजच्या आहारमध्ये समावेश करणे गरजेचे ठरते.
मशरूम लागवड चालू करण्याअगोदर आपल्याकडे काय तयारी असावी.. (What preparations should you have before starting mushroom cultivation?)
1. धिगंरीच्या वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थासाठी स्वतंत्र तीन कक्ष असावेत, बेड ठेवण्यासाठी खोलीच्या आकारानुसार, बाबू किवा लोखंडी मांडणी करावी.
2. दिड फुट खोली व दिड फुट ऊंची असलेले पाच कप्पे असलेली मांडणी तयार करावी. भिंतीच्या बाजूला एकेक वं मध्ये एकास एक लागून दोन मांडण्या ढेवण्यात येतात, काड भिजवण्यासाठी सिमेंटची टाकी (हौद) बांधून घ्याव्या.
3. त्याची मोजमापे ठरवतांना सरासरी किती उत्पादन घ्यावयाचे आहे त्याचा विचार करवा अंदाजे ५०किलो वाळलेले काड भिजवण्यासाठी ६०० लिटर क्षमतेचा हौद असावा.
4. पाण्याची किंवा औषधाची फवारणी करण्यासाठी नॅप्सॅक पंप आवश्यक आहे.
5. अळिंबी वाळविण्यासाठी १० ते २० किलो क्षमतेचा एक ड्रायर, वजनकाटा इ. साहित्य असावे.
6. मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यासाठी जास्त प्रमानमध्ये काड लागते त्यासाठी पावसापासून सुरक्षित अशी साठवण व्यवस्था लागते.
7. धिगंरी अळिंबी उत्पादन करण्यासाठी खालील निरनिराळ्या प्रकारचा कृषि क्षेत्रातिल वाया जाणारा पाळापाचोळ्याचा वापर करता येतो.
गव्हाचे काड, भाताचे काड, ज्वारीचे काड(कडबा),कापसाच्या काड्या, सोयाबिनचे काड इ.
उत्पादनासाठी लागणारे साहित्य( Materials required for production)
1. काड
2. स्पान (बी)
3. पॉलिथीन पिशव्या
4. फॉरर्मलीन
5. बाविस्टीन
6. पाणी
7. डाळीचे पीठ
लागवडीची पद्धत
- वाळलेल्या काडाचे ३ ते ४ से. मी. लाबींचे तुकडे करावेत ते बारदान्याच्या पोत्यामध्ये भरून थंड स्वच्छ पाण्यात रात्रभर(१०-१२ तास) भिजत घालावेत. काडाचे पोते पाण्यामध्ये पूर्ण बुडेल याची काळजी घ्यावी. त्यानंतर पाण्यातून काढून ४ तास निचरा करावा.
- काडाचे निर्जंतुक करण्यासाठी दोन पद्धती आहेत
- १ उष्णजल प्रकिया – भिजलेले काड निर्जंतुक करण्यासाठी उकळत्या पाण्यामध्ये किंवा वाफेवर ३० ते ४५ मिनिटे (८० ते ८५ o से.ग्रे.) ठेवावे.
- २ रासायनिक प्रकिया – या काडाचे रासायनिकनिर्जंतुक करण्यासाठी १०० लिटर पाण्यामध्ये ७.५ ग्रॅम बाविस्टीन व १२५ मि. ली. फॉरर्मलीन मिसळून, त्यामध्ये काड १५ तास भिजत ठेवावे. निर्जंतुकीकरणानंतर पाण्याचा निचरा करण्यासाठी पोते तिवईवर सावलीत ठेवावे.
- निर्जंतुक केलेले काड प्लॅस्टिकच्या पिशवीत भरतांना स्वच्छता पाळावी. जागा व सर्व साहित्य २ टक्के फॉरर्मलीनने निर्जंतुक करून घ्यावे.
- बेड भरणे – प्रथम पिशवीच्या तळाशी २ ते ३ इंच काडांचा थर ठेऊन त्यावर स्पान पेरावे . काड भरत असतांना ते तळहाताने हलकेच दाबावे. काड आणि स्पान याचे एकावर एक याप्रमाणे ५ ते ६ थर भरावेत. नंतर पिशवीचे तोंड घट्ट बांधून सर्व बाजूंनी २० ते २५ ठिकाणी छोट्या सुइणे छिद्रे पडावीत. त्या पिशव्या मांडणीच्या काट्यावर किंवा तिवईवर स्वच्छ व बंदिस्त ठिकाणी ठेवाव्यात.
काडावर अळिंबीच्या बुरशीची पूर्ण वाढ २५ अंश सेल्शिअस तापमानात १५ दिवसांत होते. काड्याचा रंग पांढरा दिसतो. टाचणीच्या टोकायएवढी अळिंबी प्लॅस्टिकच्या पिशवीत दिसू लागल्यानंतर पिशवी ब्लेडने अलगत कापून वेगळी करावी.
- पिशवी कापलेला बेड १५ से. मी. अंतर ठेऊन ओट्यावर किंवा नायलोण दोरीची मांडणी असलेल्या ठिकाणी ठेवावेत.
- हवामानांनुसार बेडवर दिवसातून २ ते ३ वेळेस पाण्याची फवारणी करावी तसेच जमिनीवर व भिंतीवर पाणी शिंपडून खोलीत आर्द्रता ८५ टक्क्यापर्यंत राहील याची काळजी घ्यावी.
- पुढील ३-४ दिवसांत ८-१० सें. मी. व्यासाची पांढरी किंवा करड्या रंगाची शिंपल्यासारखी अळिंबी तयार होते.
- काढणी – पूर्ण वाढ झालेली अळिंबी काढण्यापूर्वी ४-६ तास अगोदर बेडवर पाणी शिंपडू नये. पूर्ण वाढ झालेली अळिंबी स्वच्छ चाकू किंवा ब्लेडच्या साह्याने हळुवार कापून घ्यावी. सछिद्र प्लॅस्टिकच्या पिशव्यात भरून विक्रीसाठी पाठवावीत.
- काढणीनंतर बेडवरील काडाचा अर्धा ते एक से.मी. थर खरदडुन काढावा.
- पूर्ण वाढ झालेली अळिंबी काढल्यानंतर २ ते ३ वेळा पाणी घालावे. साधारणपणे ७-९ दिवसामध्ये दुसरे तर परत ८-१० दिवसामध्ये तिसरे पीक त्याच बेडवर तयार होते. साधारण तीन किलोच्या बेड पासून ४५ दिवसांमध्ये १.५० ते १.७५ किलो अळिंबीचे उत्पादन मिळते.
उन्हाळ्यामध्ये आर्द्रता जास्तीत जास्त कशी ठेवाल-
उन्हाळ्यामध्ये प्रथम लागवड करत असलेल्या शेतकरी वर्गासाठी लागणारी आर्द्रता रूम मध्ये टिकवणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. जर ती टिकवता आली नाही तर पूर्ण पीकाचे नुकसान होऊ शकते व त्यामधुन आमविश्वास कमी होऊन परत अळिंबी उत्पादनकडे वळून पहावे वाटत नाही त्यासाठी खालील बिनखर्चाच्या उपाय योजना आपण करू सकतो.
- मकाचा, ज्वारीचा, बाजरीचा कडबा(चारा) बांधून पत्राच्या वरती टाकावा जेणेकरून उन्हाची तीव्रता रूम मध्ये कमी जाणवेल.
- अळिंबी उत्पादन करत असलेल्या रूमच्या भिंतीवर पाणी मारणे तसेच बेड व्यतिरिक्त मधेही पाण्याची फवारणी करणे.
- आपल्या कडे असलेला बरदाणा (पोती, गोणपाट,बोदरी) अगोदर निर्जंतुक करून नंतर रूमच्या मध्ये रॅक वरती टाकणे.
- जर बाजूने लोखंडी जाळी असेल तर त्याला बरदाणा (पोती, गोणपाट,बोदरी) लाउन त्यावर दिवसातून ५-६ वेळा पाणी टाकून ओले करणे.
विक्रीसाठी काय कराल —
सर्व शेतकरी बांधवांना आणि अळिंबी उत्पादकांना भेडसावणारा सर्वात मोठा प्रष्ण तो विक्रीचा त्यासाठी खालील उपाययोजना आमलात आणू शकतो.
- घरोघरी अळिंबीचे आरोग्यातील आणि आहारातील महत्व पटवून देवून, त्यांना सुरूवातीला फ्री देऊन, अळिंबीपासून तयार होणार्या वेगवेगळे पदार्थ करून दाखवणे किंवा त्याची कृतीचे पत्रक तयार करून वाटणे.
- आपल्या उत्पादित झालेल्या अळिंबीचा दर्जा मोठमोठ्या मॉलमध्ये, हॉटेल्स मध्ये जाऊन त्यांना तो पटवून देऊन, आपले उत्पादन नियमीत त्यांना मिळेल याची शास्वती द्यावी.
- आठवडी बाजारामध्ये, यात्रेमध्ये, कृषीप्रदर्शननांमध्ये, शहरमध्ये वर्दळीच्या ठिकाणी आपल्या उत्पादित अळिंबीचा स्टाल लायून त्याची विक्री करावी.
अळिंबी उत्पादन जास्त झाल्यास काय कराल-
जास्त अळिंबी तयार झाल्यास किंवा वाळवीलेली अळिंबी विकायचीअसल्यास पुढीलप्रमाणे प्रक्रिया करावी
गार पाण्यात प्रथम अळिंबी स्वच्छ धुवावी. नंतर पातळ फडक्यात अळिंबी बांधून ती उकळत्या पाण्यात ३ ते ४ मिनिटे ठेवावी. त्यानंतर ती गार पाण्यात ठेवून थंड करावी. या प्रक्रियेला ब्लचिंग मानतात. अळिंबीतील जास्तीचे पाणी काढून झाल्यावर ती उघड्यावर परंतु सावलीत वाळवावी. अळिंबी पूर्ण वलल्यानंतर प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून सील करावी.
लेखक – प्रा. किशन रेवाळे
(Msc.Pathology)
(वनस्पती विकृती शास्त्र )
रासायनिक प्रकिया बेड ठेवण्यासाठी केलेले रॅक
१५ दिवसांनी दिसणारी पांढरी वाढ पिशवी कडल्यानंतर सुरू झालेली वाढ
पूर्ण वाढ झालेली अळिंबी रिकाम्या पाणीबोटल्स मध्ये तयार केलेली अळिंबी