राशिभविष्य

Astrology | चुकुनही तुळशीच्या बाजूला ठेवू नका ‘या’ 5 गोष्टी; अन्यथा घडतील अशुभ घटना, जाणून घ्या सविस्तर

Astrology | हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे. तसेच तुळशी ही अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. त्यामुळे पूजेच्या वेळी शिव परिवार सोडून इतर सर्व देवांना तुळशीचा डहाळा-पाने अर्पण केली जाते. भारत देशात हिंदू धर्म मानणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या घरात तुळशीचे रोप हे नक्कीच पाहायला मिळेल. तसेच तुळशीची सकाळ – संध्याकाळ पूजा केली जाते आणि सुख-समृद्धीची कामना देखील केली जाते. धार्मिक श्रद्धेनुसार, तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मीचा वास असतो. तसेच तुळस ही व्यक्तीची आर्थिक स्थिती मजबूत करण्यास हातभार लावते, असे मानले जाते.

वाचा: दिवाळी झाली आता तुळशी विवाहाची घाई! जाणून घ्या कधी आहे मुहूर्त आणि पूजेची पद्धत

कोणत्या 5 वस्तू तुळशी जवळ ठेवू नये?

1) झाडू – धार्मिक मान्यतेनुसार तुळशीजवळ झाडू कधीही ठेवू नये. कारण आपण झाडू हा घाण साफ करण्यासाठी वापरतो आणि तुळशीजवळ ठेवल्यास घरात दारिद्र्य येते. जिथे गरिबी असते तिथे माता लक्ष्मी कधीच येत नाही. पण, असे केल्याने व्यक्तीच्या जीवनात आर्थिक संकट अधिक गडद होऊ लागते.

2) कचराकुंडी – आता वास्तुशास्त्रानुसार तुळशीभोवती कचरा किंवा रद्दी ठेवू नये. आपल्या माहीतच आहे की तुळशीमध्ये माता लक्ष्मी वास करते, असे मानले जाते आणि जर तुळशीभोवती घाण असेल तर माता लक्ष्मीचा कोप होतो.

3) शूज-चप्पल – खर पाहिलं तर तुळशीचा हा उपयोग पूजेत केला जातो, आणि त्यामुळे धार्मिक मान्यतेनुसार तुळशीच्या रोपाभोवती शूज आणि चप्पल ठेवू नयेत. जर तुळशीजवळ शूज आणि चप्पल ठेवल्यास घरात सुख-समृद्धी राहण्यावर विपरीत परिणाम देखील होतो.

वाचा: दुष्काळात तेरावा महिना! आता ‘ही’ बँक शेतकऱ्यांकडून करणार आजपासून कर्जाची वसुली; तुम्ही तर घेतलं नाही ना?

4) शिवलिंग आणि शिव परिवार – काही लोकांच्या अंगणात तुळशीसोबत शिवलिंग देखील ठेवलेले असते. परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की, शिवलिंग आणि शिव परिवार तुळशीभोवती कधीही ठेवू नये.

5) काटेरी झाडे – वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरात तुळशीचे रोप असेल तर त्याभोवती कोणतेही काटेरी रोप लावू नये. जर तुम्ही असे केले तर घरामध्ये नकारात्मक उर्जेचा संचार वाढतो, ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या देखील निर्माण होतात.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web title: do you know Don’t keep these 5 things near Tulsi by mistake or else unlucky events will happen Know the reason behind this;

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button