कापसाच्या पिकावर गुलाबी बोण्ड अळीचा (Pink Bollworm )प्रादुर्भाव हा मुख्यत्वे होत असतो . हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे . याचे व्यवस्थापन करताना शेतातील कापसाचे पीक काढून टाकावे,( Remove cotton crop from field) तसेच शेतातील कापसाची फरदड घेऊ नये, असे कृषी विभागाने आवाहन केले आहे.
शेतातील पीक नष्ट करावे…
कापसाचे पीक डिसेंबर ते जानेवारी महिन्यात पूर्णपणे काढून टाकावेत त्यानंतर खोडवा घेऊ नये .असे कृषी विभागाने आवाहन केले आहे. खोडवा किंवा फरदड घेतल्याने बोण्ड अळींची श्रुंखला कायम राहण्यास मदत होते,
म्हणून खोडवा घेऊ नये खोडवा घेतल्याने बोण्ड अळींची साखळी तुटत नाही (chain of pink Bollworm doesn’t break due to re- cultivation of cotton) व त्यांचा प्रसार जास्त होतो. शेतातील राहिलेला कापूस व पालापाचोळा नष्ट करून टाकावा व शेत स्वच्छ करावेत जेणेकरून पादुर्भाव राहणार नाही.
बोण्ड अळीचा प्रादुर्भाव असलेल्या शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठांच्या शिफारशी नुसार शेतामध्ये कीटकनाशकांची फवारणी करून घ्यावी . फवारणी करताना काळजी घ्यावी , संरक्षक पोशाख , बूट, हातमोजे , मास्क, इत्यादींचा वापर करणे बंधनकारक आहे .
फवारणी तज्ञांच्या मार्गदर्शनाने करा असे आवाहन कृषी विभागाने दिले आहे.
WEB TITLE: Do not avoid the incidence of pink pharadada alica; Appeal of the Department of Agriculture