१)आंबा लागवड:
आंबा लागवड करण्यासाठी नवीन क्षेत्रात साफसफाई करून घ्यावी. लागवडीसाठी ५×५ अंतरावर १×१×१ मीटर आकाराचे खड्डे खोदून घ्यावेत खड्ड्यामध्ये माती 3,4 घमेले कुजलेले शेणखत व सुपर फास्फेट टाकून खड्डा भरून घ्यावा.
२)नारळ लागवड :
नवीन नारळ लावण्यासाठी त्या क्षेत्राची साफ-सफाई करावी. लागवडीसाठी ८×८ अंतरावर १×१×१ मीटरा आकाराचे खड्डे खोदून घ्यावेत. माती कुजलेले शेणखत व सिंगल सुपर फास्फेट दोन किलो यांनी खड्डे भरावेत.
३)चिकू लागवड:
नवीन चिकू लागवड करण्याकरिता त्या क्षेत्राची व्यवस्थितरीत्या साफसफाई करावी लागवडीसाठी२.७×२.७ अंतरावर ०.६६×०.६६×०.६६ आकाराचे खड्डे खोदून घ्यावेत त्यामध्ये कुजलेले शेणखत माती व सिंगल सुपर फास्फेट अडीच किलो याचे मिश्रण करून खड्डा भरून घ्यावा.
फळबागांची अशी घ्या काळजी:
१)हस्त बहराची फळे तोडून जास्त छाटणी करता येते. छाटणी करताना रोगग्रस्त मोडलेल्या वाळलेल्या गर्दी असलेल्या फांद्या काढाव्यात. झाडांना अन्नद्रव्याचा पुरवठा व्यवस्थित पुरवण्यासाठी बेसल डोस द्यावा.
२)फळे असलेल्या झाडांना फळे जास्त भर पडत असेल तर त्यांना बांधून आधार द्यावा.
३)डाळिंब सारख्या फळबागांना उन्हापासून संरक्षण मिळण्याकरता फळांना बटर पेपर बॅग नीट झाकून पिशवीचे खालचे तोंड उघड ठेवावे तसेच डाळिंब झाडांची पूर्ण ओळ झाकण्याकरिता क्रॉप कव्हर चा वापर करावा.