‘ पंतप्रधान किसान सन्माननिधी’ योजनेमध्ये पती-पत्नी दोघांनाही मिळतात का सहा हजार रुपये? वाचा, काय आहे नियम?
Do both husband and wife get Rs 6,000 in 'Prime Minister Kisan Samman Nidhi' scheme? Read, what is the rule?
शेतकरी (Farmers) बांधवासाठी भारत सरकार काही ना काही योजना काढत असते. त्यातील एक योजना म्हणजे,
PM शेतकरी सन्मान निधी (PM Farmers Honors Fund) योजना होय. या योजनेचा उद्देश गरीब शेतकऱ्यांना लाभ मिळावा. तसेच बियाणे, खते खरेदी करण्यासाठी रक्कम दिली जाते. सन्मान निधी योजने अंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये (Six thousand rupees) दिले जातात. 2000 रुपयांचे तीन टप्यात हे पैसे शेतकऱ्यांना त्यांच्या अकाउंटवर (On account) जमा केले जातात. शेतकरी पती पत्नीला (Husband wife) वार्षिक 6-6 हजार रुपये स्वतंत्रपणे मिळू शकतात का? चला तर पाहूया या प्रश्नाचे उत्तर.
यावर्षीपासून योजनेत काही महत्वाचे बदल करण्यात आले आहे. मोदी सरकारकडून या योजनेचा फायदा कोणाला घेता येणार आणि कोणाला वगळणार, हे स्पष्ट केले आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना शेतकरी कुटुंबसाठी (For a farming family) असली तरीही या योजनेचा लाभ कुटुंबातील एकच व्यक्ती घेऊ शकणार आहे. कायद्यानुसार कुटुंबाची व्याख्या (Definition of family according to law) पती-पत्नी आणि दोन अल्पवयीन मुले अशी व्याख्या करण्यात आली आहे. त्यामुळे कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
Therefore, only one person in the family will be able to avail the benefits of this scheme.
नवरा बायको दोघांनाही पैसे मिळतील का?
पंतप्रधान योजनेअंतर्गत नवरा-बायको दोघांनाही असल्यास, या योजनेस लाभार्थी (Beneficiaries) नाहीत. त्यामुळे सरकारकडून त्यांची रक्कम परत घेतली जाऊ शकते. म्हणजेच आशा पती-पत्नीकडून ही रक्कम वसूल केली जाऊ शकते.
हे ही वाचा :रंगीबिरंगी मक्याचे कणीस पाहिले आहे का? ‘रेनबो कॉर्न’ पासून शेतकरी मिळवत आहे बक्कळ पैसा!
कोण आहेत अपात्र?(Who are ineligible?)
- असे शेतकरी कुटुंब ज्यामधील एक किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती पुढील श्रेणीत येतात- व्यावसायिक डॉक्टर, इंजिनिअर, वकील, सीए, आर्किटेक्ट मंडळी
- घटनात्मक पदावरील शेतकरी, आजी आणि माजी मंत्री, लोकसभा आणि राज्यसभा खासदार, आमदार, महापौर, नगराध्यक्ष, जिल्हापरिषदेचे अध्यक्ष हे सर्व या योजनेच्या बाहेर आहेत.
- केंद्र सरकार/ राज्य सरकार आणि PSUs मध्ये सध्या काम करत असणारे किंवा सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी (मल्टी टास्किंग स्टाफ /चतुर्थ वर्गीय आणि ग्रुप डी कर्मचारी सोडून)
- केंद्र आणि राज्य सरकारमधील 10 हजारांपेक्षा जास्त पेन्शन घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या शेतीला देखील याचा लाभ नाही.
- मागच्या वर्षी आयकर भरणारे शेतकरी योजनेच्या फायदा मिळणार नाही.
- तुम्ही दुसऱ्याची जमिन भाड्याने घेऊन कसत असाल तरी या योजनेचा लाभ मिळणार नाही
- नोंदणी प्रक्रियेत मुद्दाम चूक करणाऱ्यांना देखील फायद्यापासून वंचित राहावं लागेल.
हे ही वाचा :
जाणून घ्या; किसान क्रेडिट कार्ड काढण्याची ऑनलाईन प्रक्रिया…
LPG Gas Cylinder मिळणार फक्त नऊ रुपयात! पहा : इंडियन ऑईल व पेटीएम कंपनीची कोणती आहे,’ ही ‘ मोठी ऑफर…