शासन निर्णय

शेतकऱ्यांची दिवाळी; 7 कोटी रुपयांचा मिळणार बोनस, “या” जिल्ह्यातील दूध उत्पादक संघाने घेतला मोठा निर्णय…

दूध उत्पादक शेतकर्‍यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रति लिटरला दूध दर फरकापोटी एक रुपया दराप्रमाणे ७ कोटी ९० लाख रुपयांचा बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांसाठी पुणे जिल्हा सहकारी कात्रज दूध उत्पादक संघाने हा निर्णय घेतला आहे

६४४ दूध संस्थाचे प्रतिनिधी सहभागी

तसेच सध्या बँकेतील (Bank) ठेवींचे व्याज दर पाच टक्क्यांपर्यंत घसरलेले असताना सुध्दा सभासद संस्थांना (member organizations) त्यांच्या शेअर्सवर (shares) १५ टक्के लाभांश देण्यात येणार आहे. त्यापोटी १ कोटी ४ लाख रुपयांचे वाटपही करण्याचा निर्णय झाला आहे. कात्रज दूध संघाचे चेअरमन विष्णू हिंगे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि.२३) रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (annual general meeting) हा निर्णय घेण्यात आला. ऑनलाईनद्वारे झालेल्या संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस ६४४ दूध संस्था प्रतिनिधींनी सहभागी होऊन यावर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.

वाचा –

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (annual general meeting) बैठकीमध्ये सर्वांच्या अध्यक्षतेखाली दूध तसेच दूध विकास मंत्री यांच्या उपस्थित निर्णय घेण्यात आले. कात्रज दूध संघास (Milk union) ज्या संस्था दूध पुरवठा (Institution milk supply) करीत नाहीत. अशा अक्रियाशिल दूध संस्थांना संघाच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार देवू नये. यासाठी संघाने न्यायालयात (court) जावे. तसा ठराव सर्व क्रियाशील दूध उत्पादक (Milk producers) संस्थांकडून मांडण्यात येवून तो सर्वांच्यामते मंजूर करण्यात आली अशी माहिती संघाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. विवेक क्षीरसागर यांनी सांगितली आहे.

वाचा –

या संघाने दूध व दुग्धजन्य पदार्थाची विक्री (Sale of milk and dairy products) वाढविण्यासाठी पुणे शहर, ग्रामीण भागात २५२ आधुनिक मिल्क पार्लर्स (Milk Parlors) सुरु केली आहेत. त्याचप्रमाणे मुंबई, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, महाबळेश्वर येथेही वितरण चालू केलेले आहे. संघाची सर्व उत्पादने (Products) गुणवत्तापूर्ण व दर्जेदार आहेत त्यामुळे केली जाणारी मागणीही मोठ्या प्रमाणात होत असते.

हे ही वाचा –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button