ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
ताज्या बातम्या

Crop Insurance | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ जिल्ह्यांचा सोयाबीन पिक विमा मंजूर; दिवाळीपूर्वी होणार खात्यात जमा

Good news for farmers! Soybean Crop Insurance Approved for 'Ya' Districts; Deposit in the account before Diwali

Crop Insurance | कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत विमा दिला जातो. याच पिक विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार झालेल्या नुकसानीच्या प्रमाणामध्ये 25% पीक विमा आगाऊ स्वरूपामध्ये देण्याची तरतूद आहे. याच्यासाठी राज्यांमध्ये विविध जिल्ह्यांमध्ये ज्या जिल्ह्यामध्ये नुकसान झाले आहे अशा जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून अधिक सूचना काढून त्या शेतकऱ्यांना बाधित झालेल्या 25% पीक विमा देण्यासाठी निर्देश देण्यात आलेले आहेत.

वाचा : Agriculture | अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ‘या’ जिल्ह्यांना तब्बल 26 कोटींचा निधी मंजूर, जाणून घ्या सविस्तर

टक्के पिक विमा देण्याचे निर्देश
तर मित्रांनो अमरावती या जिल्ह्याचा देखील सोयाबीन पिक विमा मंजूर करून जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर चंद्रपूर माध्यमातून झालेल्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 25 टक्के पिक विमा देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विदर्भामध्ये जून महिन्यात अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे किंवा जास्त पावसामुळे देखील शेतकऱ्यांचा या कालावधीमध्ये नुकसान झालं. ऑगस्ट महिन्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा खंड पडतोय आणि अशा या विचित्र वातावरणामुळे अशा या वातावरणातील बदलामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालय.

कोणत्या जिल्ह्यांचा पिक विमा मंजूर?
पिक विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार 25 टक्के पिक विमा देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याच्यासाठी नागपूर जिल्हाधिकारी साहेब यांच्या माध्यमातून 25 टक्के पिक विमा देण्याचे निर्देश देण्यात आले, याप्रमाणे परिस्थिती चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा झालेली आहे. चंद्रपूर आणि अमरावती या जिल्ह्यांसाठी अधिसूचना काढण्यात आलेली आहे. या जिल्ह्यांना 1 महिन्याच्या आत पिक विमा मिळू शकतो. ज्यामुळे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना ही रक्कम मिळेल.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Good news for farmers! Soybean Crop Insurance Approved for ‘Ya’ Districts; Deposit in the account before Diwali

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button