Kharif season | काय सांगता? शेतकऱ्यांना मोफत खते-बियाणे वाटप, जाणून घ्या पात्रता
भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा शेती (Agriculture) आहे. सध्या, खरीप हंगाम (Kharif season) सुरू होणार असून खरीप पिकांची पेरणी (Kharif crop sowing) ही जून महिन्याच्या सुरवातीस केली जाते.
Kharif season | मात्र, राज्यातील यंदाचा उन्हाळा (Summer) हा संपण्याचं नावच घेत नाहीये. जून महिना संपायला आला मात्र, तरी देखील मान्सून (Monsoon) राज्यात चांगल्या प्रमाणात दाखल झालेला नाही. त्यामुळे शेतकरी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर पूर्वमशागतीची (Pre-cultivated) कामे आवरून मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत. अशातच आता वर्धा जिल्ह्यातील (Wardha District) आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मोफत बी-बियाणांचे वाटप (Free seed distribution) करण्यात आले आहे.
कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ?
खरीप हंगामात (Kharif Season) बी-बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी धावपळ सुरू आहे. मात्र, करोनामुळे आणि इतर कारणांमुळे अडचणीत सापडलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांचा आधारच गेल्यामुळे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मोफत बियाणे आणि खतांची वाटप करण्यात आली आहे.
वाचा: Crop Insurance | ‘या’ योजनेअंतर्गत तब्बल 180 कोटींचा पीक विमा वितरित, पात्र शेतकऱ्यांनाच मिळणार लाभ
वर्धा सोशल फोरम
संबंधित उपक्रम हा वर्धा सोशल फोरम आणि दत्ता मेघे फाऊंडेशनच्या यांच्या वतीने मान्सून भेट 2022 या नावाने राबवण्यात आला आहे. तसेच, या उपक्रमात पद्मश्री बिजमाता राहीबाई पोपेरे यांच्या हस्ते मोफत बियाणांचे आणि खतांचे वितरण करण्यात आले आहे. तसेच, यावेळी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, डॉ. अभ्यूदय मेघे, हे उपस्थित होते.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा: