कृषी बातम्या

Crop Insurance | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ 5 जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 14 ऑक्टोबरपूर्वी होणारं शंभर टक्के पीक विम्याचं वाटप

Crop Insurance | यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून पिक विमा योजनेअंतर्गत (Crop Insurance Scheme) नुकसान भरपाईचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी तब्बल 3 हजार 501 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना (Agriculture) शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीतून काहीसा आर्थिक (Financial) दिलासा मिळणार आहे. दिवाळीपूर्वी म्हणजेच 15 ऑक्टोबर 2022 पासून शेतकऱ्यांच्या खात्यात ही जमा केली जाईल अशी माहिती देण्यात आली होती. परंतु आता पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 14 ऑक्टोबरपूर्वी शंभर टक्के पिक विम्याची (Crop Insurance) मदत वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात हे पाच जिल्हे कोणते आहेत.

वाचा: राज्य सरकारकडून सामान्यांना दिवाळीचं मोठं गिफ्ट! 100 रुपयांत मिळणार ‘या’ वस्तू, वाचा महत्त्वपूर्ण निर्णय

शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना (Agriculture in Maharashtra) टप्प्याने मदतीचे वितरण करण्यात येणार होते. अमरावती विभागातील शेतकऱ्यांना दोन टप्प्यासाठी तब्बल 1457 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले होते. मात्र, 1 महिना होऊनही शेतकऱ्यांच्या (Agricultural Information) खात्यावर याचा 1 रुपयाही जमा झाला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता.

निधी तात्काळ वितरीत करण्याचे निर्देश
विदर्भ पटवारी संघाच्या माध्यमातून हा निधी वितरीत करण्याबाबत असमर्थता दर्शवण्यात आली होती. यामुळे हा निधी (Fund) वितरीत होण्यास विलंब झाला. परंतु यामुळे शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त करण्यात आला आणि आंदोलने करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर 3 ऑक्टोबर 2022 रोजी विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून पत्रक काढून जिल्हाअधिकाऱ्यांना तात्काळ निधी वितरीत करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

वाचा: शेतकऱ्यांची दिवाळी होणार दणक्यात! दिवाळीपूर्वी मिळणार पीएम किसानचा 12वा हप्ता, ‘या’ लाभार्थ्यांना मिळणार 4 हजार

कोणत्या 5 जिल्ह्यांना होणार वाटप?
जिल्हाअधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून नुकसानग्रस्त जिल्ह्यांतील गावे महसूल विभाग, कृषी विभाग आणि ग्राम विकास विभागाला काही गावे देऊन डाटा गोळा करून याची माहिती पुढे शासनाला तात्काळ पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर नुकसानग्रस्त जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना 14 ऑक्टोबरपूर्वी 100 टक्के निधी वितरीत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये अमरावती, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Web Title: Good news for farmers! Distribution of 100 percent crop insurance to the damaged farmers in these 5 districts before October 14

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button