पशुसंवर्धन

रोगनियंत्रण; शेळया-मेंढयाांमधील बुळकाडी ( पेस्ट-डेस-पेटीट्स रुमीनन्टस )

शेळया-मेंढयाांन होणारा एक विषाणूजन्य रोग असून हा रोग अतितीव्र स्वरुपाचा जलद रोग पसरणारा आहे.

प्रसार :-

⇒ प्रादुर्भाव प्रामुख्याने 4 महिने ते 24 महिने या वयोगटातील शेळया-मेंढयाांमध्ये दिसून येतो.

⇒ रोगाचा प्रसार प्रामुख्यानेकळपातील लागण झालेल्या जनािराांच्या डोळे/नाक/तोांड यामधून येणारा स्त्राि विष्ठेमधून किंवा बाधीत शेळया-मेंढयाांच्या शिंका अथवा खोकल्यामधून इतर वनरोगी शेळया-मेंढयाांमध्ये होतो.

⇒ शेळया-मेंढयाांच्या वाडयांमधील बाधीत सामान, पाणी, खाद्याची भांडी, तसेच गवताचा बिछाना यामुळे देखील या रोगाचा प्रसार झपाटयाने होतो.

लक्षणे:-

⇒ बाधीत शेळया-मेंढयाांमध्ये अचानक ताप येऊन (40 ते 41 डिग्री सें.) शेळया-मेंढया गुांगलेल्या, उदासीन व झापड आल्यासारख्या दिसतात.

⇒ डोळे, नाक व तोांडातून सुरुिातीला पाण्यासारखा व नांतरजाड व पिळसर स्त्रािव येतो.

⇒ विष्ठा पातळ होते व विष्ठेस घाण वास येतो विष्ठेतून रक्तस्त्राव होतो.

⇒ श्वासोश्वास करण्यास त्रास होतो, श्वास घेताांना आवाज होतो, खोकताांना त्रास होतो.

⇒ गाच्या अतितीव्र स्वरुपा मध्ये बाधीत जनावरांचा मृत्यू होण्याची शक्यता असते.

रोगनियंत्रण

⇒ दुय्यम जिवाणू जन्य आजार टाळण्यासाठी पशुिैद्यकीय तज्ञ उपचार करावेत

⇒ तोांडातील विकृती धुण्यासाठी 4 टक्के पोटॅवशयम परमँगनेट अथवा 4 टक्के सोडीयम

बायोकाबोनेटचे द्रावण वापरावा.

⇒ वाड्यामध्ये मध्ये स्वच्छता व निर्जतुकीकरण करणे आवश्यक आहे. .

⇒ मृत शेळया-मेंढयाांना जवमनीत खोलिर पुरुन त्या वर चुना पावडर टाकू न त्याांची योग्य विल्लेवाट लावावी.

⇒ वयोगट 4 महिने व त्या वरील वयाच्या शेळया-मेंढयाांमध्ये पी.पी.आर. प्रवतबांधात्मक

लसीकरण करावे .

⇒ या रोगामधील शेळया-मेंढयाांच्या मरतुकीमुळे शेतक-याांचे मोठया प्रमाणात होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी पशुसंवर्धन विभाग मार्फत राज्यभरात सन 2010-11 या वर्षांपासून “पी.पी.आर.रोगनियंत्रण कार्यक्रम” (पी.पी.आर.-कंट्रोल प्रोग्राम ) या योजनेमध्ये राज्यातील 100 टक्के शेळया-मेंढयाांना पी.पी.आर. रोग प्रवतबांधक लसीकरण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

WEB TITLE: Disease control; Pest-des-Petitis ruminants

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button