सध्याच्या कोविड परिस्थितीमुळे अनेक लोक जॉब सोडून शेती मध्ये उत्पन्न घेत असताना दिसत आहेत. कृषि अधिकाऱ्यांचा सल्ला घेवून शेती केली तर शेती व्यवसायला दूसरा कोणता व्यवसाय मागे पाडणार नाही. अशाच एका निवृत्त न्यायाधीशची शेत पिकवणी पाहणार आहोत. ज्यांनी निवृत्तीनंतर कृषी अधिकार्यांचा सल्ला घेत सोयाबीनची बाग फुलवली. सोयाबीनचे विक्रमी उत्पन्न घेतले.
वाचा –
कांदा लागवडीचा विचार करत आहात? तर या अधिक उत्पादनाच्या जातींबद्दल जाणून घ्या व मिळवा भरघोस उत्पन्न..
अहमदपूर तालुक्यातील सावरगाव रोकडा येथील निवृत्त न्यायाधीश विजयकुमार बोडके पाटील यांनी शेती अनुभव नसताना शेती फुलवली. कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने आद्रकाच्या पिकात टोकन पद्धतीने सोयाबीनची बेडवर लागवड केली.
नियोजन पद्धती –
यांनी अनेक कामगारांचे सल्ले सुद्धा घेतले. शेतात काम करणाऱ्या कामगारांचे सल्ले उपयोगी पडल्याचे देखील सांगितले आहे. लागवड करण्याआधी शेतीची मशागत, शेण खताचा वापर, रासायनिक खताची मात्रा, कीटक नाशक औषधे तसेच फवारणी, खुरपणी याचे यांनी योग्य नियोजन केले.
वाचा-
उत्पादन –
सोयाबीनच्या १८ किलो बियाणामध्ये त्यांना २२ क्विंटल उत्पादन काढले आहे. पावसाच्या अगोदर सोयाबीन पिकाची काढणी काढल्याने उत्पादनात भर पडली. तसेच सोयाबीन हे आद्रकामध्ये आंतरपीक म्हणून पिक घेतल्याने दुहेरी पिकांचेही उत्पादन म्हणल्यावर फायदाच झाला आहे.
बियाणे कमी व उत्पादन जास्त –
सोयाबीन लागवड आता टोकन पद्धतीने सुद्धा केली जाते. या पद्धतीवर शेतकर्यांचा अधिक भर असतो. टोकन पद्धतीने ३ बाय ९ इंचावर सोयाबीनची लागवड केली तर पिकाला खेळता वर मिळतो. त्यामुळे आंतरपीक सोयाबीन व त्यासोबत असलेले पिक चांगले येते. व उत्पादनात सुद्धा चांगली भर पडते. अशी सोयाबीन लागवड केल्यास अधिक फायदेशीर ठरू शकते.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा