कोवीड - १९

Coronavirus | बाप रे! कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये आता पसरतोय ‘हा’ रोग, संशोधनात माहिती आली समोर

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संसर्गाने जगभरात आपली दहशत निर्माण केली आहे. या विषाणूमुळे अनेक जीव देखील गेले आहेत.

Coronavirus | कोरोना (Corona) संसर्गामुळे नागरिकांची शारीरिक हानी, तर झालीच परंतु आर्थिक हानीला देखील त्यांना सामोरे जावे लागले आहे. त्यानंतर कित्येक दिवसांनी कोरोना विषाणूच्या लसीचा (Corona Vaccine) शोध लागला. तेव्हा कुठे नागरिकांना सुटकेचा निश्वास सोडायला धीर मिळाला. गेल्या दोन वर्षात अनेक नागरिक कोरोना विषाणूला बळी पडले. मात्र, कोरोना संक्रमित झालेल्या रुग्णांबद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे. आता कोरोना संसर्ग झालेले नागरिक नव्या आजाराला बळी पडत असल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोना झालेल्या लोकांमध्ये उद्भवतोय ‘हा’ रोग
कोरोना संक्रमित झालेल्या रुग्णांमध्ये डायबिटीस हा आजार उद्भवत आहे. परंतु, डायबिटीस (Diabetes ) हा सामान्य रोग आहे. तो कोणालाही उद्भवू शकतो. अलीकडे झालेल्या संशोधनामध्ये अशी माहिती समोर आली आहे की, कोरोना होणे आणि डायबिटीस होण्यामध्ये एक संबंध आहे.

वाचा: Booster Dose| आता कोरोनाचा होणार नायनाट! बुस्टर डोसला आजपासून सुरुवात, पूर्वीपेक्षा किंमत झाली कमी

या’ लोकांना होतोय डायबिटीस
तर 18 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या 5 लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोना झाला होता. याचा अहवाल अहवालावर अमेरिकन डेटानुसार या लोकांना डायबिटीस होण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे.

वाचा: China Corona | बाप रे! चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक, कडक निर्बंधामुळे नागरिकांची उपासमार, वेळीच सावध राहण्याची गरज; पहा कशी आहे स्थिती…

या लोकांना टाइप २ डायबिटिस होण्याची शक्यता
संशोधनामध्ये असे आढळून आले की, ज्येष्ठ नागरिकांमध्ये 40 ला लाखांपेक्षा समान जास्त रुग्णांचा एकच पॅटर्नचा आढळला. रुग्णांमध्ये डायबिटीसचे टाईप 2 होते. एक जर्मन अध्ययनामध्ये 80 लाखांपेक्षा जास्त रुग्णांच्या मेडिकल अहवालावर, त्यांना नंतर टाइप २ डायबिटिस होण्याची शक्यता असल्याचे आढळले. कोरोनामुळे डायबिटीस होण्याचे अनेक सिद्धांत आहेत. परंतु अद्याप कोणतेही सिद्ध झालेले नाही.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा णि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button