ताज्या बातम्या

Dhantrayodashi | धनत्रयोदशी दिवशी ‘हे’ खास उपाय केल्यानंतर प्राप्त होईल लक्ष्मीकृपा; आर्थिक लाभासाठी जाणून घ्या सविस्तर

Dhantrayodashi | Special Remedies for Dhantrayodashi: Do these Remedies to Get Lakshmi Grace

Dhantrayodashi | या दिवशी काही खास उपाय केल्याने लक्ष्मीकृपा प्राप्त होते आणि वर्षभर आर्थिक सुख-समृद्धी नांदते. चला तर मग जाणून घेऊया धनत्रयोदशीसाठी खास उपाय:

दिवाळीचा सण जवळ आला आहे आणि त्याचबरोबर धनत्रयोदशीची सुद्धा आतुरतेने वाट पाहत आहोत. हिंदू धर्मात धनत्रयोदशीला(Dhantrayodashi) विशेष महत्त्व आहे. या दिवशी देवी लक्ष्मी, भगवान कुबेर आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते.

अक्षताचा उपाय

धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी आणि भगवान कुबेराची पूजा केली जाते. त्यानुसार पूजनासाठी 21 अक्षत म्हणजेच तांदूळ घ्या. तांदूळ हे खंडीत नसावे याची काळजी घ्या. या तांदूळांना स्वच्छ लाल कपड्यात बांधून त्यांची पूजा करा. नंतर ते तुमच्या तिजोरीत ठेवा. या उपायाने आर्थिक समस्यांपासून आराम मिळतो.

लवंगाचा उपाय

धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान कुबेरासह देवी लक्ष्मीची पूजा करा. पूजेदरम्यान देवी लक्ष्मीला दोन लवंग अर्पण करा. हा उपाय रोज करा. असे केल्याने धनाशी संबंधित समस्या दूर होत लक्ष्मीकृपा लाभते.

13 दिव्यांची पूजा

धार्मिक मान्यतेनुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी रात्री 13 दिवे लावणे खूप शुभ मानले जाते. असे केल्याने धनाशी संबंधित समस्या दूर होत व्यवसायात अपार यश मिळते. त्यामुळे या दिवशी 13 दिवे घेऊन त्यात तूप व वात सोबत प्रत्येकी एक कवडी टाकावी. यानंतर, त्यांना आपल्या घराच्या अंगणात ठेवा. यानंतर मध्यरात्री 13 कवडी उचलून घराच्या कोणत्याही कोपऱ्यात पुरून टाका. या उपायाने खूप लाभ होईल.

वाचा: 500 वर्ष नंतर दिवाळीवर तीन राशींना होणार मोठा लाभ! जाणून घ्या कोणत्या राशी आहेत भाग्यशाली?

गोमती चक्राचा उपाय

धनत्रयोदशीच्या दिवशी 5 गोमती चक्रे घेऊन त्यावर केशर आणि चंदनाने ‘श्री ह्रीं श्री’ लिहा. यानंतर देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करावी. नंतर तुमची इच्छा असेल तर हे गोमती चक्र एका स्वच्छ लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा. या उपायाने सकारात्मक लाभ होत जीवनातील संकट दूर होत कायम लक्ष्मी कृपा होत राहते.

या व्यतिरिक्त, धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी, कपडे, भांडी इत्यादी खरेदी केल्याने वर्षभर आर्थिक सुख-समृद्धी नांदते. या दिवशी घराची स्वच्छता करून, नवीन वस्तूंची खरेदी करून आणि दिवे लावून घराला सजवल्याने लक्ष्मी घरी येते असे मानले जाते.

तर, चला या वर्षी धनत्रयोदशीच्या शुभ दिवशी वरील उपाय करून लक्ष्मीकृपा प्राप्त करूया.

हेही वाचा :

Web Title : Dhantrayodashi | Special Remedies for Dhantrayodashi: Do these Remedies to Get Lakshmi Grace

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button