Dhananjay Munde | ब्रेकींग! अधिसूचित सर्व मंडळांमध्ये शेतकऱ्यांना मिळणारं नुकसान भरपाई; कृषिमंत्री धनंजय मुंडे
Breaking! Compensation to farmers in all notified circles; Agriculture Minister Dhananjay Munde
Dhananjay Munde | महाराष्ट्रात 21 दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड असलेल्या मंडळांमध्ये पीक विमा योजनेतील नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिले आहे. यासाठी विमा कंपन्यांनी आक्षेप घेतले होते, परंतु कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून प्रत्यक्ष तपासणी केल्यानंतर तेथेही पाऊस नसल्याचे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व अधिसूचित मंडळांमध्ये शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश विमा कंपन्यांना देण्यात आले आहेत. दिवाळीपूर्वी ही अग्रीम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असेही मुंडे यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना केल्या जारी
राज्याचा रब्बी हंगामाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी सांगितले की, कृषी विभागाने जाहीर केलेल्या मंडळांपेक्षा जास्त मंडळांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना जारी केली. त्यावर विमा कंपन्यांनी आक्षेप घेतले. पर्जन्यमापकाच्या परिसरात झालेल्या पावसामुळे त्या ठिकाणी खंड दिसून येत नाही. मात्र परिसरातील अन्य २५ गावांमध्ये पाऊस नव्हता. कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून त्या गावांमधील पिकांची व पावसाची स्थिती शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध करण्यात आली. त्यामुळे निकषांमधील दुसऱ्या घटकाच्या आधारे आता या पंचनाम्यांवर कंपन्यांनी घेतलेले आक्षेप रद्द केले आहेत.
वाचा : Dhananjay Munde | शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड! पिक विम्यापासून ते ऐतिहासिक कांद्याच्या दरापर्यंत कृषिमंत्री धनंजय मुंडेंच्या घोषणा
गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई
शेतकऱ्यांच्या नावाखाली भरपाईची लुटणाऱ्या गैरप्रकारांबाबत विचारले असता मुंडे यांनी सांगितले की, विम्याची नोंद सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच असे प्रकार लक्षात आले. या प्रकारांची नोंद कागदोपत्री घेण्यात येत आहे. याची पूर्ण माहिती हाती आल्यानंतर शेतकरी दाखवून, इतर इतरांच्या जमिनी दाखवून, रक्कम लुटण्याचे प्रकार करणाऱ्यांवर निश्चित कारवाई केली जाईल.
पर्जन्यमापकात पाणी ओतून अवकाळी पाऊस झाल्याचे प्रकारही वाशिम जिल्ह्यात घडले आहेत. याबाबत मुंडे यांनी पोलीस कारवाईचा गंभीर इशारा दिला. कंपन्यांकडून अशी तक्रार कृषी विभागाकडे आल्यानंतर ती पोलिसांकडे देऊन पोलिस त्याचा तपास करतील व योग्य ती कारवाई करतील असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. त्यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना धन्यवाद दिले आहेत.
हेही वाचा :
Web Title: Breaking! Compensation to farmers in all notified circles; Agriculture Minister Dhananjay Munde