ताज्या कृषी बातम्या व अपडेटसाठी आजच जॉईन करा ‘मी E शेतकरी’ चा व्हॉटसॲप चॅनेल...

जॉईन करा
कृषी बातम्या

Dhan Bonus | धान शेतकऱ्यांना दिलासा! २० हजारांचा बोनस जाहीर, पाच लाख लाभार्थी जाणून घ्या सविस्तर

Dhan Bonus | Relief for paddy farmers! 20 thousand bonus announced, five lakh beneficiaries know in detail

Dhan Bonus | राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी हर्षदायक बातमी आली आहे. गेल्या वर्षी झालेल्या उत्पादनातील घट आणि यंदाच्या हवामानामुळे अपेक्षित घट लक्षात घेऊन, राज्य सरकारने (Dhan Bonus) धान उत्पादकांना प्रति हेक्टर २० हजार रुपये बोनस देण्याची घोषणा केली आहे. यामुळे राज्यातील जवळपास पाच लाख शेतकऱ्यांना थेट आर्थिक लाभ होणार आहे.

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले, “धान हा राज्यातील प्रमुख पीक असून लाखो शेतकरी यावर अवलंबून आहेत. गेल्या वर्षी उत्पादनात घट झाली होती. यंदाही पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीचे चीज करण्यासाठी आणि त्यांना आधार देण्यासाठी आम्ही २० हजार रुपये प्रति हेक्टर बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे.”

या योजने अंतर्गत, प्रत्येक शेतकरीला जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंतच्या क्षेत्रफळावर बोनस मिळणार आहे. यासाठी राज्य सरकारने तब्बल एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हा बोनस थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याने त्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळणार आहे.

वाचा : One Rupee Insurance | एक रुपया विमा योजना; जनतेचा पैसा सरकरच्या मित्र कंपन्यांना मिळाला का?

सहकार मंत्री आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिपक मोहिते पाटील यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. ते म्हणाले, “ही शेतकऱ्यांवरील मोठी आणि काळाच्या गरजेची आहे. यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढणार आहे आणि उत्पादनासाठी प्रेरणा मिळणार आहे.”

धान बोनस योजनेमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. विदर्भ, मराठवाडा आणि कोकण या धान उत्पादक विभागांतील शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title : Dhan Bonus | Relief for paddy farmers! 20 thousand bonus announced, five lakh beneficiaries know in detail

हेही वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button