Wednesday| देवशयनी एकादशी: या 3 राशींना मिळणार नशिबाची साथ, होईल प्रगती
Wednesday| अमरावती, 17 जुलै 2024: आज बुधवार, 17 जुलै रोजी आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2024) किंवा देवशयनी एकादशी साजरी होत आहे. चंद्र वृश्चिक राशीत भ्रमण करत असल्याने आणि नवपंचम योग तयार होत असल्याने आजचा दिवस खास मानला जातो. याच दिवसापासून चातुर्मास सुरू होत आहे.
आज एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, बुद्धादित्य योग आणि अनुराधा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत आहे. यामुळे आजचा दिवस अनेकांसाठी शुभ मानला जातो. ज्योतिषशास्त्रामध्ये असे मानले जाते की, या शुभ संयोगामुळे काही राशींना विशेष लाभ मिळू शकतात.
वाचा: Pig troubles| डुकरांपासून पिकांचे संरक्षण कसे करावे|
तर, आज कोणत्या 3 राशींना (Zodiac Signs) नशिबाची साथ मिळणार आणि पांडुरंगाची कृपा लाभेल? जाणून घेऊया:
1. वृषभ रास (Taurus):
वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप खास असणार आहे. आज तुम्ही सुज्ञ निर्णय (decision) घेऊ शकता आणि तुमच्या कामात यशस्वी होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशातील प्रवेश मिळण्यास मदत होईल. व्यावसायिकांना अधिक नफा मिळेल आणि त्यांचं वर्चस्व वाढेल. नोकरदारांना चांगल्या पगाराच्या नोकरीची ऑफर मिळू शकते. सासरच्या लोकांशी संबंध सुधारण्यास मदत होईल आणि लव्ह लाईफमधील गैरसमज दूर होतील.
2. सिंह रास (Leo):
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप फलदायी (fruitful) असणार आहे. धार्मिक कार्यात तुम्ही सक्रिय भाग घ्याल आणि तुमचं मन शांत राहील. वडिलोपार्जित संपत्ती किंवा गुंतवणुकीतून तुम्हाला पैसे मिळतील आणि कर्जातून मुक्ती मिळेल. नोकरदारांना पदोन्नती आणि इतर फायदे मिळण्याची शक्यता आहे आणि व्यावसायिकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. पालकांच्या सल्ल्याने तुमची अनेक कामं पूर्ण होतील आणि तुम्ही तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करू शकता. वैवाहिक जीवन चांगलं राहील आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत काही मालमत्ता खरेदी करू शकता.
3. कन्या रास (Virgo):
कन्या राशीच्या लोकांना देवशयनी एकादशीचा खूप लाभ मिळेल. या राशीच्या लोकांची प्रत्येक वाटेवर प्रगती होईल. अनेकांना प्रगतीच्या मार्गावर पुढे जाण्याच्या सुवर्ण संधी मिळतील. गुंतवणुकीतून (from investments) तुम्हाला लाभ होईल. नवीन नोकरी किंवा बढतीच्या शोधात असलेल्या लोकांना यश मिळेल. व्यावसायिकांना लाभाच्या संधी उपलब्ध होतील. घरातील वातावरण आज प्रसन्न राहील. तुम्ही धार्मिक कार्यात व्यस्त दिसाल आणि तुमच्या मुखी विठ्ठल नामाचा जप चालू राहील.