Soybean | सोयाबीनची नवीन जात विकसित! करणार पाण्याचा ताण सहन अन् प्रति हेक्टरी मिळणारं ‘इतके’ उत्पादन
Soybean | सध्या इंदूर येथील भारतीय सोयाबीन संशोधन संस्थेने (आयआयएसआर) (Indian Soybean Research Center) बदलत्या वातावरणात तग धरणारी आणि पाण्याचा ताण सहन करणारी सोयाबीनची एनआरसी १३६ ही जात (Soybean Verity) विकसित केली आहे. तसेच मध्य प्रदेशात या जातीच्या प्रसाराला मान्यता मिळाली आहे. तसेच पूर्व विभागातील काही राज्यांमध्ये येत्या खरीप हंगामात या जातीची लागवड (Soybean Cultivation) होईल, अशी माहिती भारतीय सोयाबीन संशोधन संस्थेच्या संचालिका डॉ. नीता खांडेकर यांनी दिली.
त्यामुळे आता मध्य प्रदेश सरकारने या नवीन जातीला मान्यता दिली असून पुढील खरीप हंगामापासून लागवड सुरू होईल. तसेच दहा वर्षांच्या संशोधनानंतर एनआरसी-१३६ ही जात विकसित करण्यात आली आहे. मॉन्सूनच्या कालावधीत दीर्घकाळ खंडामध्ये ही जात तग धरते. मध्य प्रदेशात या जातीच्या प्रसारणास मान्यता मिळाली आहे.
कशी घेतात बियानाची चाचणी
आता बिहार सरकारने पुढील हंगामासाठी या जातीचे बियाणे उपलब्ध होण्यासाठी मागणी नोंदविली आहे. तसेच महाराष्ट्रात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये या जातीची चाचणी घेण्यात येत आहे. चाचण्यांचे हे दुसरे वर्ष असून, तीन वर्षांच्या निष्कर्षानंतर महाराष्ट्रात या जातीच्या प्रसारणास मान्यता दिली जाणार आहे, अशी माहिती भारतीय सोयाबीन संशोधन संस्थेतील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. ज्ञानेशकुमार सातपुते यांनी दिली.
बियाणांच्या जातीची वैशिष्ट्ये…
- दाणे भरण्याच्या काळात पावसाचा २० ते २५ दिवसांचा खंड पडला तरी समाधानकारक वाढ झाली.
- हे १०२ दिवसांत तयार होते.
- मूगबीन यलो मोझॅक रोग, पाने खाणाऱ्या अळीस मध्यमस्तरीय प्रतिकारक.
- प्रति हेक्टरी १७ क्विंटल उत्पादन.
- ओडिशा, छत्तीसगड, बिहार, झारखंड राज्यांत पेरणीसाठी प्रसारित.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- बाप रे! मगरीच्या तोंडात जाऊनही जिवंत कसा? साधी खरचटही नाही; पहा आश्चर्यचकीत करणारा व्हिडिओ
- शेतकऱ्यांनो दिवाळीच्या मुहूर्तावर घरी आणा नवा ट्रॅक्टर! सरकारकडून मिळणार 50 टक्के अनुदान, त्वरित घ्या लाभ
Web title : A new breed of soybeans developed! Know in detail