कृषी तंत्रज्ञान

पेरणीपासून काढणीपर्यंतचे यांत्रिणीकरण विकसित; या शेतकऱ्याचे आगळेवेगळे प्रयोग पहाच..

यांत्रिणीकरण (Mechanization) ही शेतकऱ्यांसाठी गरज बनली आहे. शेतकरी (Farmers) नवनवीन यंत्र (Machine) शेतात आणण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत असताना दिसून येतो. काळाप्रमाणे यांत्रिणीकरण गरजेचे आहे. अशाच ऐका शेतकऱ्याने आपल्या 80 एकरात बोडखा (ता. धामनगाव रेल्वे, जि. अमरावती) येथे राहणाऱ्या नामदेव वैद्य यांनी पेरणी ते काढणीपर्यंत शेतीत यांत्रिकीकरण (Mechanization) केले आहे. या जमिनीत विविध यंत्रांचा वापर करीत श्रम, वेळ व पैसा यात बचत केली तसेच गरजेनुसार स्वकौशल्यातून काही यंत्रेही विकसित केली. या यांत्रिणीकरण विषयी सविस्तर माहिती घेऊया…

वाचा – स्पिरुलिना शेती ठरेल शेतकऱ्याला फायदेशीर; पहा या शेतीची प्रक्रिया व काढणी..

यांत्रिकीकरण

सुरवातीला दोन एकर, त्यानंतर चार एकर असे करीत नामदेव यांनी शेतीचा विस्तार सुमार ४९ एकरांपर्यंत केला आहे. आपल्या मित्राची ३० एकर शेती ३५ वर्षांपासून कसत आहेत. नामदेव यांनी गावातील काही शेतकऱ्यांच्या सहकार्याने कास्तकार सोया प्रोड्यूसर (Kastkar Soya Producer) कंपनीची उभारणीही केली. सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा अशी विविध पिके नामदेव घेतात. अलीकडील काळात त्यांनी गरजेनुसार काही यंत्रे (Machine) घेतली. तसेच काही विकसित केली वा त्यात बऱ्याच सुधारणा केल्या.

ट्रॅक्टरचलित खत देणारे यंत्र –

या खत देणाऱ्या यंत्रातून शेणखत किंवा दाणेदार (Manure or granular) स्वरूपातील रासायनिक खत देता येते. सोयाबीन, कापूस, हरभरा, तीळ आदी पिकात त्याचा वापर पेरणीपूर्व काही दिवस आधी करता येतो. एका दिवसात सुमारे २० ते २५ एकरांपर्यंत वापर शक्य होतो.

कापूस पेरणी यंत्र –

राजस्थानातून कापसाचे बियाणे (Cotton seeds) ठेवण्यासाठी दोन बॉक्स आणले. यंत्राचे बाकी ‘डिझाईन’ (Design) नामदेव यांनी आपल्या गरजेनुसार घरी बनवले. यामध्ये जुन्या काकऱ्यांचा वापर केला. चाके मार्केटमधून घेतली. बैलचलित या यंत्राद्वारे दिवसभरात सहा एकर काम पूर्ण होते. साडेपाच हजार रुपये या यंत्राची किंमत आहे.

वाचा –

“या” जिल्ह्यातील रब्बी हंगामासाठी 11 हजार अर्ज; लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची केली जाणार निवड, पहा बंपर ऑफर..

कटर मशिन

कपाशीची काढणी झाल्यानंतर उर्वरित भागांचे तुकडे करून त्याचे अवशेष शेतातच पसरविण्याचे काम हे यंत्र करते. सुमारे एक लाख ८० हजार रूपयांत ते खरेदी केले आहे. दिवसाला तीन ते चार एकरांपर्यंत या यंत्राद्वारे काम होते.

पेरणी यंत्र –

हे यंत्र सोयाबीन तसेच मका, हरभरा, उन्हाळी मूग ,तीळ आदी पिकांतही वापरता येते. पेरणी झाल्यानंतर सरी झाकण्यासाठी देखील सुविधा केली आहे.

कपाशीला खत –

नामदेव यांनी आपल्या गरजेनुसार हे यंत्र स्थानिक कार्यशाळेत तयार केले आहे. कपाशी व्यतिरिक्त उसाला त्याचा वापर होऊ शकेल असे ते म्हणतात. दिवसभरात ६ एकरांचे काम हे यंत्र दोन व्यक्तींमध्ये होते.

कृषी रत्न पुरस्काराने नामदेव यांचा गौरव

क्षेत्र मोठे असल्याने मजूर उपलब्धतेची मोठी अडचण निर्माण व्हायची. ती पाहता २०१४ मध्ये ट्रॅक्टर खरेदी केला. त्यासोबतच पेरणी यंत्रही घेतले. गरज वाढल्यानंतर डिसेंबर २०१६ मध्ये अजून एक ट्रॅक्टर खरेदी केला. ट्रॅक्टरच्या वरील बाजूचा टप काढून दोन्ही बाजूंना २५ लिटर क्षमतेचा पंप बांधून तुरीवर फवारणी करण्याचा प्रयोग केला.
कापूस एकरी १३ ते १४ क्विंटल, सोयाबीन १२ क्विंटल, हरभरा ९ ते १० क्विंटल असे उत्पादन ते घेतात. प्रयत्न, कौशल्य व कार्याची दखल घेत राजीव गांधी फाउंडेशनच्या वतीने कृषी रत्न पुरस्काराने नामदेव यांचा गौरव करण्यात आला आहे.

मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..

हे हि वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button