1500 रुपये महिना जमा करा व मिळवा 35 लाख रुपये; पोस्ट ऑफिसच्या “या” योजनेबद्दल माहीत आहे का?
कमी जोखमीचे रिटर्न किंवा गुंतवणुक पर्याय शोधत असाल तर पोस्ट ऑफिसची एक स्कीम उपयोगी पडू शकते. भारतीय पोस्ट (Indian Post) द्वारे देण्यात येणारी ग्राम सुरक्षा योजना (Gram Suraksha Yojana) एक असा पर्याय आहे ज्यामध्ये कमी जोखीममध्ये चांगला रिटर्न मिळवू शकता. ग्राम सुरक्षा योजनेंतर्गत बोनससह ठराविक रक्कम 80 वर्षाच्या वयात किंवा मृत्यूच्या स्थितीत कायदेशीर वारस नामित व्यक्तीला, जे सुद्धा अगोदर असेल ते मिळेल.
वाचा –
नियम आणि अटी –
19 ते 55 वर्ष वयोगटातील कुणीही भारतीय नागरिक ही विमा योजना घेऊ शकतो. किमान विमा रक्कम 10,000 रुपयांपासून 10 लाख रुपयांपर्यंत गुंतवणुक करू शकता.
प्रीमियम पेमेंट मासिक, त्रैमासिक, अर्ध-वार्षिक किंवा वार्षिक करू शकता. प्रीमियमचे पेमेंट करण्यासाठी 30 दिवसांची सूट आहे. पॉलिसी कालावधीत प्रीमियम न भरल्यास बंद पडल्याच्या स्थितीत ग्राहक पॉलिसी पुन्हा सुरू करण्यासाठी प्रलंबित प्रीमियमचे पेमेंट करू शकतो. (Gram Suraksha Yojana) ही विमा योजना कर्ज सुविधेसोबत येते, ज्याचा लाभ पॉलिसीधारकाला चार वर्षानंतर मिळतो.
सरेंडर पॉलिसी –
ग्राहक 3 वर्षानंतर पॉलिसी सरेंडर करू शकतो. मात्र, अशावेळी कोणताही लाभ मिळणार नाही.
पॉलिसीचे सर्वात मोठे आकर्षण इंडिया पोस्टद्वारे दिला जाणारा बोनस आणि अंतिम घोषित बोनस प्रति वर्ष 65 रुपये प्रति 1,000 रुपये आहे.
वाचा –
मॅच्युरिटी बेनेफिट –
19 वर्षाच्या वयात 10 लाखाची ग्राम सुरक्षा पॉलिसी खरेदी केली तर 55 वर्षासाठी मासिक प्रीमियम 1,515 रुपये, 58 वर्षासाठी 1,463 रुपये आणि 60 वर्षासाठी 1,411 रुपये असेल. पॉलिसी खरेदाराला 55 वर्षासाठी 31.60 लाख रुपये, 58 वर्षासाठी 33.40 लाख रुपयांचा मॅच्युरिटी बेनिफिट मिळेल. 60 वर्षासाठी मॅच्युरिटी बेनिफिट 34.60 लाख रुपये होईल.
वाचा –
माहिती –
नामांकित व्यक्तीचे नाव किंवा इतर माहिती जसे ईमेल आयडी आणि मोबाइल नंबरमध्ये कोणत्याही अपडेच्या बाबतीत, ग्राहक जवळच्या पोस्ट कार्यालयात जाऊ शकतो.
इतर प्रश्नांसाठी, ग्राहक दिलेली टोल-फ्री हेल्पलाईन 1800 180 5232/155232 किंवा अधिकृत वेबसाइट www.postallifeinsurance.gov.in वर संपर्क करू शकतो.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हे हि वाचा