Crop Insurance | शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे प्रचंड आर्थिक (Financial) तोटा सहन करावा लागला आहे. कारण शेतकऱ्यांच्या शेती (Department of Agriculture) पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता याच नुकसानीची भरपाई म्हणून पीक विमा कंपन्यांकडे दावे करून देखील अद्याप काही जिल्ह्यांतील शेतकरी या पीक विम्याचा (Crop Insurance) रक्कमेच्या प्रतीक्षेत आहेत. आता याच संदर्भात राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सूचना दिल्या आहेत.
वाचा: ब्रेकिंग! आता आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर अन् म्हणतात शेतकऱ्यांना दिवसा वीज देऊ
कृषिमंत्र्यांनी दिल्या सूचना
“नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या (Crop Insurance) प्रलंबित प्रस्तावांवर पाच दिवसांत कार्यवाही करून येत्या आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक (Bank) खात्यावर विम्याची रक्कम जमा करावी,’’ अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी अशा सूचना दिल्या आहेत.
वाचा: अरे वाह! ‘या’ कार्डधारकांना मिळणार तब्बल पाच लाखांचा फायदा; जाणून घ्या तुम्हाला मिळणार का लाभ?
शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाही तर….
‘‘पीक विम्याचे (Crop Insurance) पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत तर चालढकल करणाऱ्या विमा कंपन्यांना जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल. प्राप्त 51 लाख 31 हजार सूचनांपैकी 46 लाख 9 हजार अर्जांचे सर्वेक्षण झाले आहे. प्रलंबित 5 लाख 21 हजार अर्जांवर सर्वेक्षण तातडीने पूर्ण करण्यात यावे. नैसर्गिक आपत्तीत (Natural Disaster) नुकसान भरपाई रक्कम तात्काळ निश्चित करावी. विमा कंपन्यांना (Insurance Company) एनडीआरएफच्या नियमानुसार नुकसान भरपाई द्यावी लागेल, असे कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले आहे.
मी E-शेतकरी आता टेलीग्राम आणि व्हाट्सअँप वर जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
आजच ताज्या बातम्यांसाठी मी E-शेतकरी मोबाईल अॅप डाऊनलोड करा; येथे क्लिक करून डाउनलोड करा..
हेही वाचा:
- शेतकऱ्यांना मालामाल होण्याची सुवर्णसंधी! ‘हे’ टॉप 10 कृषी व्यवसाय शेतकऱ्यांना करतील श्रीमंत
- अरे बाप रे! मृत्युपत्रात नाव असूनही मिळणार नाही संपत्तीचा वाटा, जाणून घ्या काय आहे नियम
Web Title: Farmers will get crop insurance amount in next 8 days; Instructions given by the Minister of Agriculture